शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

देगलूरमधील दोन मतदान केंद्रांवर सहा वाजल्यानंतरही शेकडो मतदारांच्या रांगा, यंत्रणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 19:20 IST

शहरातील साधना हायस्कूल येथील दोन मतदान केंद्रांमध्ये मतदारांच्या रांगा होत्या

-शेख शब्बीरदेगलूर:  नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व देगलूर विधानसभा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या मतदानासाठी  देगलूर शहरातील केंद्र क्रमांक 209 व 210 या ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. या ठिकाणी सायंकाळी सहा वाजेच्यानंतरही मतदान प्रक्रिया चालू असून प्रशासनातर्फे उर्वरित मतदारांना जवळपास दीडशे टोकन देण्यात आले आणि मतदानाचा अवधी अडीच ते तीन तास वाढवून देण्यात आल्याचे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले.

देगलूर विधानसभा मतदारसंघात 312,237 मतदार आहेत. दरम्यान, शहरातील साधना हायस्कूल येथील केंद्र क्रमांक 209 व केंद्र क्रमांक 210 या ठिकाणी सायंकाळी सहा वाजेच्या नंतरही मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. वेळ संपल्यानंतरी केंद्रांवर महिला व पुरुष मतदारांची मोठी गर्दी होती. यंत्रणेने जवळपास 150 मतदारांना मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी टोकन दिले. 

दरम्यान, सहा वाजेनंतरही मतदानाची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास दोन ते अडीच तासाचा वेळ लागणार असल्याचा अंदाज निवडणूक विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. शेकडो मतदार प्रतीक्षेत असल्याने निवडणूक विभागासह पोलीस प्रशासन केंद्रावर सज्ज असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकdeglur-acदेगलूर