शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अपयशी ठरलेल्या भाजपाला सत्तेबाहेर खेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:37 IST

अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने समाजातील सर्वच घटकांवर अन्याय केला आहे. मराठा, लिंगायत, धनगर व मुस्लिम समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या आहेत.

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण : लिंगायत समाजाच्या मेळाव्यात केले आवाहन

नांदेड : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने समाजातील सर्वच घटकांवर अन्याय केला आहे. मराठा, लिंगायत, धनगर व मुस्लिम समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या आहेत. व्यापारी, शेतकरी, शेजमजूर व अल्पसंख्याक यांच्या मुळावर उठलेल्या या भाजप सरकारला सत्तेबाहेर खेचा असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केले.येथील ए.के.संभाजी मंगल कार्यालयात बुधवारी आयोजित लिंगायत समाजाच्या मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत, आ. अमिताताई चव्हाण, आ.वसंतराव चव्हाण, आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस हरिहरराव भोसीकर, माजी महापौर शैलजा स्वामी, स्थायीचे माजी सभापती किशोर स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेसने सर्व जातीधर्माला समान न्याय देण्याचे काम केले आहे. संधी मिळेल तेव्हा लिंगायत समाजातील व्यक्तींनाही सन्मानाचे पद दिले. महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा नांदेड शहरात व्हावा ही समाजबांधवांची मागणी पूर्ण करण्यासाठी मनपाने पावले उचलली असून पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देवून या धर्माला अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याचा निर्णय कर्नाटक शासनाने घेतला आहे. महाराष्टÑात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्हीही हा दर्जा देवू असा शब्द खा. चव्हाण यांनी यावेळी दिला. लिंगायत समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी काँग्रेस सरकारने निर्णय घेतला. त्याचा फायदा आता होत आहे. या समाजातील काही पोटजातीला अद्याप याचा लाभ मिळत नाही. तोही लवकरच देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे ते म्हणाले. मेळाव्याला जि.प.सभापती माधवराव मिसाळे, माजी तालुकाध्यक्ष माधवराव पांडागळे, वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हुरणे, माजी जि.प.सदस्य माधवराव बेळगे, जि.प.सदस्य संजय बेळगे, तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, प्रवक्ते संतोष पांडागळे, जि.प.सदस्य अनिल पाटील खानापूरकर, माजी जि.प.सदस्य संजय भोसीकर, माजी नगराध्यक्ष सुनील शेट्टे, माजी उपनगराध्यक्ष राजीव शेट्टे, बच्चुराज देशमुख, चंदापुरे, बालाजी बंडे, महावीर शिवपुजे, अ‍ॅड.बाबूराव देशमुख, उद्योजक माधवराव पटणे, बाबूराव सायाळकर, दिलीप डांगे, उज्वल केसराळे, सदाशिवराव बुटले, शेषराव दंडे, महेश स्वामी, व्यंकटेश बारूळे, संतोष दगडगावकर, शंकरराव कंगारे, सुभाष देशमुख आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार संतोष पांडागळे यांनी मानले.

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणlok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक