शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जनविरोधी सरकारला सत्तेतून बाहेर खेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:41 IST

राज्यव्यापी अभियानाला शनिवारी माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमधून सुरुवात करण्यात आली़ शिवाजीनगर येथील गड्डम कॉम्प्लेक्समध्ये जनसंपर्क अभियानासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते़

ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणकाँग्रेसच्या जनसंपर्क अभियानाला सुरुवात

नांदेड : विश्वासघातकी, जुलमी व भ्रष्ट केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी काँग्रेस पक्षाने जनसंपर्क अभियानाची सुरुवात केली आहे़ या राज्यव्यापी अभियानाला शनिवारी माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमधून सुरुवात करण्यात आली़शिवाजीनगर येथील गड्डम कॉम्प्लेक्समध्ये जनसंपर्क अभियानासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते़ या अभियानांतर्गत प्रभाग क्र.८ मधील अनेक मतदारांच्या घरी जावून त्यांच्या भेटी घेतल्या व पक्षाला मतदानासह भरीव आर्थिक मदत करा, असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मंचावर माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत, महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, कोषाध्यक्ष विजय येवनकर, शमीम अब्दुल्ला, विरेंद्रसिंघ गाडीवाले, नजीर अहेमद बाबा, किशोर भवरे, पप्पू पाटील कोंढेकर, विठ्ठल पावडे, शंकर शिंदे आदींची उपस्थिती होती.यावेळी खा. चव्हाण म्हणाले, युपीए व एनडीए या दोन सरकारची तुलना केली असता, युपीए सरकार कामामध्ये सरस असल्याचे सहज दिसते. युपीएच्या काळात ५ लाख ३० हजार नवीन प्राथमिक शाळा सुरु केल्या आल्या. तर मोदी सरकारने मागील दोन वर्षांत ४३ हजार शाळा बंद केल्या आहेत. शिक्षणावर युपीएच्या काळात ४़५७ टक्के तर एनडीएच्या काळात ३़४ टक्के इतका खर्च झाला आहे़युपीएने ६० हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले़ याचा फायदा देशातील ३ कोटी शेतकºयांना मिळाला़ तर एडीएच्या काळात कर्जमाफी झालीच नाही. युपीएच्या काळात कृषी विकासदर ३़८४ टक्के तर एनडीएच्या काळात केवळ १़८३ टक्के इतका राहिला आहे. ग्रामीण मजुरी वृद्धीदर युपीएच्या काळात १०़६६ टक्के तर एनडीएच्या काळात ३़६ टक्के, युपीएच्या काळात इंदिरा आवास योजनेअंतर्गत २८़६ लाख तर एनडीएच्या काळात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १६़६६ लाख घरांचे बांधकाम करण्यात आले.माजी पालकमंत्री आ़ सावंत म्हणाले, जनतेच्या मुळावर उठलेल्या या सरकारला आता मतदारच कंटाळले असून २०१९ मध्ये होणाºया निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल़ आ. राजूरकर यांनी हे सरकार विश्वास घातकी, जुलमी व भ्रष्ट असल्याचे उदाहरणासह पटवून दिले. २ कोटी युवकांना दरवर्षी रोजगार, महागाईवर नियंत्रण, प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख आदी योजना केवळ चुनावी जुमला असल्याचे सांगतानाच दलित, अल्पसंख्याक व महिलांवरील अत्याचारामध्ये मोठी वाढ झाली आहे. भ्रष्टाचार बोकाळला असून राफेल खरेदीमध्ये ४० हजार कोटींची दलाली झाल्याचे ते म्हणाले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले विजय येवनकर यांनी आभार मानले.यावेळी नगरसेविका मोहिनी येवनकर, नागनाथ गड्डम, दुष्यंत सोनाळे, फिरोजभाई, संदिप सोनकांबळे, रुपेश यादव, प्रशांत सोनकांबळे, प्रकाश रोकडे, गोपी मुदीराज, श्रीनिवास भुसेवार, प्रशांत गड्डम, सचिन करवा, अमितकुमार वाघ आदी उपस्थित होते़काँग्रेसची विचारधारा घराघरापर्यंत पोहोचवाआंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव कमी असतानासुद्धा अबकारी कर वाढवून पेट्रोल आणि डिझेलचे भाव आकाशाला नेऊन ठेवले आहेत. हे सरकार सर्वार्थांने जनविरोधी असून या सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची आता वेळ आली आहे. काँग्रेस पक्षाने जनसंघर्ष ते जनसंपर्क असा आंदोलनाचा व अभियानाचा टप्पा पार केला आहे. राज्यातील प्रत्येक घरामध्ये जावून काँग्रेसची विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा जनसंपर्क अभियानाचा उद्देश असल्याचे यावेळी खा़ अशोकराव चव्हाण यांनी सांगितले़

टॅग्स :Nandedनांदेडcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण