शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

पुणे विभागाचा मुलींचा संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:11 IST

मुलींच्या गटात अंतिम सामन्यात पुणे विभागाने अमरावती विभागावर एक गोलने मात केली. मंगळवार, १३ रोजी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणीद्वारे महाराष्ट्र फुटबॉल संघाची निवड होणार आहे.

ठळक मुद्देसगरोळीत राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा कोल्हापूर मुलांचा संघ विजेता

सगरोळी : येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात १२ रोजी कोल्हापूर विभागाने मुंबईचा ३ विरुद्ध शून्य असा दणदणीत पराभव केला तर मुलींच्या गटात अंतिम सामन्यात पुणे विभागाने अमरावती विभागावर एक गोलने मात केली. मंगळवार, १३ रोजी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणीद्वारे महाराष्ट्र फुटबॉल संघाची निवड होणार आहे.क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, क्रीडा परिषद नांदेड, जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड व संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी यांच्या वतीने रविवार, ११ पासून राज्यस्तरीय शालेय १४ वर्षांखालील मुला व मुलींच्या फुटबॉल स्पर्धेस सुरुवात झाली. या स्पर्धेसाठी नऊ विभागांतील मुलींचे ९ व मुलांचे ९ अशा एकूण १८ संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सोमवार, १२ रोजी मुलींमध्ये कोल्हापूर विरुद्ध पुणे ही लढत झाली. यामध्ये पुणे विभागाने १ गोलने विजय मिळविला. अमरावती व मुंबई यांच्यामधील सामन्यात अमरावती विभागाने १ विरुद्ध शून्य असा विजय मिळविला. पुणे व अमरावती विभागात अंतिम सामना झाला यामध्ये पुणे विभागाने १ विरुद्ध शून्य गोलने अमरावतीचा पराभव करून राज्यस्तरीय स्पर्धा जिंकली. अमरावती विभागास उपविजेतेपद मिळाले. तिसºया स्थानासाठी कोल्हापूर विरुद्ध मुंबई यांच्या सामन्यात मुंबईने बाजी मारली.मुलांमध्ये कोल्हापूर विरुद्ध औरंगाबाद यांच्या लढतीत कोल्हापूर विभागाने विजय मिळविला. मुंबई व नाशिकमधील सामन्यात मुंबईने ३ विरुद्ध शून्य या फरकाने सामना जिंकला. अंतिम सामना कोल्हापूर व मुंबई या चुरशीच्या लढतीत कोल्हापूर विभागाने मुंबई विभागावर ३ विरुद्ध शून्यने मात करीत विजेतेपद पटकावले. तिसºया स्थानासाठी झालेल्या लढतीत नाशिकने औरंगाबाद विभागाचा पराभव केला.१३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणीद्वारे महाराष्ट्र फुटबॉल संघाची निवड होणार आहे. यासाठी खेळाडू, प्रशिक्षक व पालक यांनी सगरोळी येथे हजेरी लावली. राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघास पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे, संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, नांदेड जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव के. आर. अन्सारी, फुटबॉल निवड समितीचे अध्यक्ष धीरज मिश्रा, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडा अधिकारी गुरुदीप सिंग, राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक वामन सर, नंदकिशोर जाधव उपस्थित होते़

टॅग्स :NandedनांदेडFootballफुटबॉल