शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शेतकऱ्यांना सरसकट विमा द्या; अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:54 IST

जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला असताना त्याला मदत करण्याऐवजी आणेवारी चुकीची दाखवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. जिल्ह्यात सोयाबीनसह मूग, उडदाचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला आहे. मात्र याच पिकांना पंतप्रधान पीक योजनेतून वगळल्याचे सांगत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मंजूर करावा, अन्यथा काँग्रेसच्या वतीने जिल्हाभरात आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही खा. चव्हाण यांनी दिला.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचा इशारा: शासनाने काढलेली आणेवारी चुकीची

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला असताना त्याला मदत करण्याऐवजी आणेवारी चुकीची दाखवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. जिल्ह्यात सोयाबीनसह मूग, उडदाचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला आहे. मात्र याच पिकांना पंतप्रधान पीक योजनेतून वगळल्याचे सांगत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मंजूर करावा, अन्यथा काँग्रेसच्या वतीने जिल्हाभरात आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही खा. चव्हाण यांनी दिला.सोमवारी सायंकाळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यातील शेतकरी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात विम्याचा हप्ता भरला आहे. हा हप्ता भरतानाही शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मागीलवर्षी सुरुवातीला अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या बहुतांश भागातील शेतकऱ्यांवर संकट आले. त्यानंतर पावसात मोठा खंड पडला. यामुळेही शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुसरीकडे जिल्ह्यात नेमका किती पाऊस झाला? याचाच ताळेबंद शासनाकडे नाही.अनेक ठिकाणची पर्जन्यमापक यंत्रे कार्यान्वित नाहीत. या तांत्रिक चुका, त्यात पिकांची आणेवारीही जास्तीची काढण्यात आली. या सर्व प्रकारांमुळेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी विम्यापासून वंचित राहिला. यास शासन-प्रशासनाचे निष्क्रिय धोरण कारणीभूत असल्याची टीका करीत पीकविमा कंपनीकडे असलेल्या अपुऱ्या मुनष्यबळाचाही फटका नुकसान भरपाई मिळण्यास झाल्याचे ते म्हणाले.जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती. मात्र नेमके यातीलच काही पिकांना पंतप्रधान पीक योजनेतून वगळले. पर्यायाने याचाही फटका शेतकऱ्यांना बसला असल्याचे सांगत सरकारने वेळीच हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा. अन्यथा काँग्रेसच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल, असे ते म्हणाले.नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी ७ तालुक्यांना सोयाबीनची नुकसान भरपाई मिळालेली नाही. नांदेड तालुक्यातील २१ हजार ५३ शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विमा भरला होता. तर भोकरमध्ये १२ हजार ५३५, धर्माबाद ९ हजार २८१, मुदखेड १५ हजार ९१, मुखेड २१ हजार ५३, उमरी तालुक्यातील ९ हजार ९३१ शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विमा भरुनही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे त्यांनी सांगत या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असून मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठविणार आहे. यातील कायदेशीर बाजूही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.सेना-भाजप सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांकडे डोळेझाक केल्यानेच समस्या अधिक जटिल झाल्याचे सांगत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले.---सरकारच्या खिसे भरण्याच्या धोरणामुळे भाडेवाढपरिवहन महामंडळाने नुकतीच १८ टक्के भाडेवाढ केली आहे. एस.टी. तून प्रवास करणारा वर्ग सर्वसामान्य कष्टकरी आहे. या वर्गाला या भाडेवाढीमुळे मोठा फटका सोसावा लागत असल्याचे सांगत एकीकडे इंधनावर विविध कर लादायचे आणि त्या माध्यमातून खिसे भरण्याचे काम सरकार करीत आहे. दुसरीकडे एस.टी.ची भाडेवाढ करुन सर्वसामान्यांना दुहेरी फटका, इंधनावर सर्वाधिक व्हॅटही महाराष्टतच असल्याचे सांगत सरकारचे आर्थिक धोरण कोलमडल्याची टीका खा. अशोकराव चव्हाण यांनी केली. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद देशामध्ये जातीय तणाव निर्माण करीत आहे. ही बाब देशासाठी घातक असल्याचे आम्ही सांगत होतो. आज सरकारची सर्वोच्च यंत्रणाही याच पद्धतीचे अहवाल देत असून सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पहायला हवे, असेही त्यांनी सांगितले.---समविचारी पक्षांना सोबत घेणारभीमा-कोरेगाव प्रकरणातील भिडे, एकबोटे यांच्यावर कारवाई होत नाही. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात मागासवर्गीय समाजातील तरुणांना नग्न करुन मारहाण केली जाते. महाराष्टत हे काय सुरु आहे? येणाऱ्या काळात सरकारच्या या धोरणामुळे सामाजिक संघर्ष अधिक वाढण्याची चिंता व्यक्त करीत २०१९ च्या निवडणुका समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढणार असल्याचे खा.अशोक चव्हाण यांनी सांगितले.शिवसेना, मनसे आणि एमआयएम या पक्षांना आमचा तात्त्विक विरोध आहे. मात्र भारिप, बसपा, शेकाप, जनता दल त्याबरोबरच खा. राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष आणि रिपाइंचे कवाडे-गवई गट यांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये, हाच यामागे हेतू असल्याचे ते म्हणाले. सरकारला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखणे महाराष्टच्या हितासाठी आवश्यक असल्याचेही खा.अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणFarmerशेतकरीbankबँक