शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

मुखेड, किनवट येथे निषेध रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:19 IST

राज्यातील मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या अ, ब, क, ड वर्गीकरणानुसार आरक्षण देण्यात यावे या मागणी साठी जलसमाधी घेतलेल्या संजय ज्ञानोबा ताकतोडे यांच्या कुंटुबाला २५ लाख रुपयाचे अनुदान द्यावे, मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गवारी प्रमाणे आरक्षण द्यावे, या मागण्यांसह सरकारच्या बेजबाबदारपणाचा निषेध करण्यासाठी मुखेड येथे ७ मार्च रोजी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर रॅली काढण्यात आली़

मुखेड : राज्यातील मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या अ, ब, क, ड वर्गीकरणानुसार आरक्षण देण्यात यावे या मागणी साठी जलसमाधी घेतलेल्या संजय ज्ञानोबा ताकतोडे यांच्या कुंटुबाला २५ लाख रुपयाचे अनुदान द्यावे, मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गवारी प्रमाणे आरक्षण द्यावे, या मागण्यांसह सरकारच्या बेजबाबदारपणाचा निषेध करण्यासाठी मुखेड येथे ७ मार्च रोजी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर रॅली काढण्यात आली़ताकतोडे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत समाविष्ट करावे, अशी मागणी करत मातंग समाजाच्या आरक्षण प्रकरणी विविध संघटनांनी लावुन धरलेल्या मागणीकडे मुख्यमंत्री जाणुन बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला़ मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील मातंग समाजाचा तरुण कार्यकर्ता संजय ज्ञानोबा ताकतोडे यांच्या आत्महत्येस प्रर्वत करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला़ निवेदनावर भारतीय लहुजी सेनेचे मराठवाडा प्रमुख गणपतराव गायकवाड, रमेश बदार्पुरे, पंकज गायकवाड, प्रितम गवाले, नितिन तलवारे, कैलास आंदे, बालाजी गायकवाड, अनिल कावडे, सरपंच परशुराम गवाले आदींचे सह्या आहेत.यावेळी नामदेवराव वाघमारे, सुनीता गायकवाड, सग्याबाई गाउकवाड, प्रेमला वाघमारे, खलिताबाई सोमवारे, चौञाबाई कांबळे आदी उपस्थित होते.लसाकमचे निवेदनलसाकम शाखा किनवट च्या वतीने शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला़ यावेळी लसाकम चे अध्यक्ष संजय तलवारे ,सचिव कृष्णकांत सूनकलवाड,डॉ सुरेंद्र शिंदे, प्राचार्य डॉ आनंद भंडारे,दुगार्दास बटूर, तुकाराम जळपतराव, आनंद भालेराव, प्रा समूखराव,बसवंते आदी उपस्थित होते़सरकारच्या बेजबाबदारपणाचा निषेधकिनवट : संजय ताकतोड यांनी घेतलेली जलसमाधी ही अत्यंत दुदैवी असून सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही घटना घडली असून सरकारच्या धोरणाचा किनवट येथील सकल मातंग समाजाच्यावतीने निषेध नोंदवण्यात आला़ या बाबतचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मातंग समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करावे, संजय ताकतोडे यांच्या कुटुंबाला शासनाने त्वरीत २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे,या मागण्यांचे निवेदनात देण्यात आले़ मागण्या मान्य न झाल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला़ निवेदनावर माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, शिवन्ना कलगोटवार,गंगाधर तोटरे, नारायण सांगळे, मारोती सुंकलवाड,आनंद भालेराव, बापूराव माहूरकर, मारोती तोटरे, सुरेश मंत्रीवार,दंत्तोपंत पोलेवार,संजीव कोत्तुरवार,मोहन बोलेनवार,रवि उप्परवार,अशोक आरपेल्लीवार, नंदकुमार बसवंते,के. स्वामी, प्रवेश संकेवार, अरुण मुकनपेल्लीवार,दत्ता गडलवाड,आकाश भंडारे,अशोक मारपवार, आकाश बोल्लेनवार यांच्या स्वाक्ष-या आहेत.मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीसंजय ताकतोड यांच्या आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अण्णाभाऊवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली़ यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़ संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांची आर्थिक मदत करावी, अनुसूचित जाती अबकड वर्गीकरणाची शिफारस केंद्र शासनाकडे करावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या़ निवेदनावर आकमचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रा़ सदाशिव भुयारे, सरचिटणीस अंतेश्वर बंदुकी, प्रा़ इरवंत सूर्यकर, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, अण्णाभाऊवादी स्टुडंटस फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दिलीप कंधारे, महासचिव माधव भुयारे, अरविंद कु-हे आदींच्या स्वाक्ष-या आहेत़

टॅग्स :Nandedनांदेडagitationआंदोलन