शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

जातवैधता प्रमाणपत्रासाठी समितीकडे प्रस्तावांचा ढिगारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:22 IST

जिल्हा जात पडताळणी समितीने मागील वर्षभरात जवळपास १६ हजार ८०० विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र अदा केले आहे़ परंतु, मागील महिनाभरापासून विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्याने समितीकडे जातवैधता प्रमाणपत्राच्या प्रस्तावांच्या फाईलचा ढिगारा पडला आहे़

ठळक मुद्देजात पडताळणी समिती वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया

श्रीनिवास भोसले।नांदेड : जिल्हा जात पडताळणी समितीने मागील वर्षभरात जवळपास १६ हजार ८०० विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र अदा केले आहे़ परंतु, मागील महिनाभरापासून विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्याने समितीकडे जातवैधता प्रमाणपत्राच्या प्रस्तावांच्या फाईलचा ढिगारा पडला आहे़ विद्यार्थ्यांना वेळेत जातवैधता प्रमाणपत्र न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होवू शकते़सध्या वैद्यकीय, अभियांत्रिकीच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे़ या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार की नाही या संभ्रमावस्थेत असलेल्या अनेकांनी प्रमाणपत्रच काढले नाही़ दरम्यान, मराठा आरक्षणानुसार वैद्यकीय तसेच अभियांत्रिकीचे प्रवेश करण्याचा निकाल आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे़१६ टक्के मराठा आरक्षणानुसार वैद्यकीय तसेच अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया पार पडणार असल्याचा निकाल न्यायालयाने दिला़ त्यामुळे मराठा समाजातील तरूणांची जात प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी एकच गर्दी होत आहे़बहुतांश विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षण निर्णय झाला तेव्हाच एसईबीसीचे प्रमाणपत्र काढून ठेवले आहे़ परंतु, जातवैधता प्रमाणपत्र काढले नाही़ त्यातच ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अथवा अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळाला तर त्यांना ठरावीक मुदतीत कागदपत्रे पडताळणी करताना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे़ त्यामुळे आरक्षण असूनही वैधता प्रमाणपत्राअभावी अनेकांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित रहावे लागेल, अशी परिस्थिती आहे़जिल्हा जात पडताळणी समितीने वर्षभरात १८ हजार प्रलंबित प्रस्तावांपैकी १६ हजार ८०० प्रस्ताव निकाली काढले़ त्याचबरोबर मागील महिनाभरात सातशेहून अधिक प्रस्ताव दाखल झाले असून त्यापैकी जवळपास १२८ प्रस्ताव निकाली काढून विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र वितरित केल्याचे समाज कल्याण आयुक्त तथा जिल्हा जात पडताळणी समिती सदस्य जलील शेख यांनी सांगितले़आजघडीला जिल्हा जात पडताळणी समितीकडे शेकडो प्रस्ताव पडून असून ते तत्काळ निकाली काढणे गरजेचे आहे़ जात सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे़ यामध्ये एससीसाठी १९५० चा पुरावा, एसईबीसी, ओबीसीसाठी १९६७ चा तर व्हीजेएनटीसाठी १९६१ मधील पुरावा लागतो़ त्यात प्रवेश निर्गम, खासरा पानी, खरेदी खत, विक्री खत, जुने शासकीय कागदपत्रे, कोतवालबुक आदी कागदपत्रांचा समावेश आहे़ वडील अथवा रक्ताचे नातेसंबंध असणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्रेही प्रस्तावासोबत जोडता येतात़

विद्यार्थ्यांना वेळेत जातवैधता प्रमाणपत्र देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे़ कोणीही बाहेरच्या व्यक्तीच्या भुलथापांना बळी पडू नये़ प्रस्तावासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली असल्यास दुसºयाच दिवशी जातवैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना अदा केले जाईल़ त्रुटी असलेली कागदपत्रे असल्यास तपासणीस वेळही लागतो़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी आवश्यक आणि योग्य कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडावीत़- शेख जलील, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात पडताळणी समिती, नांदेड़

टॅग्स :NandedनांदेडCaste certificateजात प्रमाणपत्रSocialसामाजिक