शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

२५ वाडी-तांड्यांवर पुरक नळयोजनांना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:50 IST

कंधार तालुक्यात आतापर्यंत ३३ विहिरी अधिग्रहण करण्यासाठीचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयामार्फत प्राप्त झाले होते. त्यापैकी २६ विहिरींचे अधिग्रहण प्रस्ताव तसेच २५ वाडी-तांड्यांवरील पुरक नळयोजना व तात्पुरती नळ दुरुस्तीच्या कामास प्रथम प्राधान्य देत तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी पाणीटंचाई प्रश्न मार्गी लावला आहे.

ठळक मुद्देकंधार तालुक्यात एकही टँकर नाही राष्ट्रीय पेयजल योजनेतील कामांची कसून तपासणीचे आदेश जारी

गोविंद शिंदे।बारुळ : कंधार तालुक्यात आतापर्यंत ३३ विहिरी अधिग्रहण करण्यासाठीचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयामार्फत प्राप्त झाले होते. त्यापैकी २६ विहिरींचे अधिग्रहण प्रस्ताव तसेच २५ वाडी-तांड्यांवरील पुरक नळयोजना व तात्पुरती नळ दुरुस्तीच्या कामास प्रथम प्राधान्य देत तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी पाणीटंचाई प्रश्न मार्गी लावला आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेतील कामाची कसून तपासणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले.कंधार तालुक्यात एकाही पाण्याच्या टँकरसाठी मान्यता मिळाली नसल्याने टँकर सुरु करण्यात आले नाहीत. कंधार तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणार्थ ८ कोटी ३६ लाख खर्च करून उपाययोजना करण्यास प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे. तालुक्यातील वाडी- तांड्यांवर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्या अनुषंगाने सन २०१८ - २०१९ पाणीटंचाई भासू नये म्हणून उपाय योजना करणे चालू आहे. कायमस्वरुपी पाणीटंचाई प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना गतकाळात केल्या़परंतु त्या निष्प्रभ ठरल्या. कंधार तालुक्यातील ४७ गावांत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठ्याच्या नावाखाली ९ कोटी ४४ लाख ७४ हजार एवढा निधी येऊनही कंधार तालुक्यातील वाडी-तांडे तहानलेलेच असल्याची तक्रार मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने करुन चौकशी करण्याचे निवेदन दिले होते.पैकी राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित झालेली गावे घोडज येथील तीन व दिग्रस खुर्द येथील योजनेच्या कामाची तात्काळ तपासणी करुन कार्यवाहीबाबतचे आदेश संबंधितांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर पानशेवडी, सावेळेश्वर गुंडा-बिंडा- दिंडा, शिरशी बु., खंडगाव (ह.), वहाद येथील कामाची तपासणी होणार आहे. पाणीटंचाई निवारणार्थ पंचायत समिती कार्यालयातून प्राप्त विहीर, बोअर अधिग्रहण प्रस्तावांपैकी तळ्याचीवाडी, हिरामणतांडा -१, मंगलसांगवी -३, हटक्याळ-३, भेंडेवाडी-१, मादाळी-१, मसलगा-२, कुरुळा-१, हासूळ-३, आंबुलगा -२, पिंपळ्याचीवाडी-१, टोकवाडी-१, ब्रम्हवाडी-१, हिप्परगा शहा-१, कौठावाडी- १, लिंबातांडा -१, जाकीपूर-२, हाळदा-१ आदी गावांत २५ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीत सुमारे २६ विहिरींचे अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण झाली आहे.तसेच १ आॅक्टोबर २०१८ ते ३० जुलै २०१९ या पाणीटंचाई कालावधीसाठी पुरक पाईपलाईन दुरुस्ती, नवीन पाईपलाईन, विहिरींची खोली वाढवणे आदी योजनांपैकी हजारो रुपयांची तात्पुरती पुरक नळ योजनात मानसिंगवाडी, लिंबातांडा, चोळीतांडा, गुट्टेवाडी, बाचोटी, आलेगाव, शिरशी (बु.) आदीचे प्रस्ताव प्राप्त झाले. तर नळयोजना विशेष दुरुस्तीत मुंडेवाडी, घोडजतांडा, संगमवाडी, पानशेवडी, गणातांडा, वळसंगवाडी, औराळ, बाचोटी तांडा, नागलगाव उदातांडा, दुर्गातांडा, कुरुळा नरपटवाडी, रुई, सावरगाव नि., गुंडाबिंडा, दिंडा, काटकळंबा, खंडगाव ह., शिराढोण आदी वाडी- तांड्यांवर नळयोजना विशेष दुरुस्ती प्रस्ताव मान्यता मिळण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आले आहेत.कंधार तालुक्यातील वाडी तांड्यांवर संभाव्य पाणीटंचाई पाहता लोकसभा निवडणूक कामात अधिकारी- पदाधिकारी व्यस्त असतानाही पाणीटंचाई कामास प्राधान्य असल्याची माहिती मांडवगडे यांनी दिली. यासाठी नायब तहसीलदार सारंग चव्हाण, नायब तहसीलदार कुलकर्णी, उत्तम जोशी, बळवंत वरपडे परिश्रम घेत आहेत.१ आॅक्टोबर २०१८ ते ३० जुलै २०१९ या पाणीटंचाई कालावधीसाठी पुरक पाईपलाईन दुरुस्ती, नवीन पाईपलाईन, विहिरींची खोली वाढविणे आदी योजनांपैकी हजारो रुपयांची तात्पुरती पुरक नळ योजनेत मानसिंगवाडी, लिंबातांडा, चोळीतांडा, गुट्टेवाडी, बाचोटी, आलेगाव, शिरशी (बु.) आदींचे प्रस्ताव प्राप्त झाले. तर नळयोजना विशेष दुरुस्तीत मुंडेवाडी, घोडजतांडा, संगमवाडी, पानशेवडी, गणातांडा, वळसंगवाडी, औराळ, बाचोटी तांडा, नागलगाव उदातांडा, दुर्गातांडा, कुरुळा नरपटवाडी, रुई, सावरगाव नि., गुंडा, बिंडा, दिंडा, काटकळंबा, खंडगाव ह., शिराढोण आदी वाडी- तांड्यांवर नळ योजना विशेष दुरुस्ती प्रस्ताव मान्यता मिळण्यासाठी वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :nanded-pcनांदेडWaterपाणीwater transportजलवाहतूक