शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

'राजकुमार पोचरस याने केशवेश्वर मंदिराला...'; येरगीत आढळला चालुक्यकालीन शिलालेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 14:00 IST

येरगी या गावाच्या पाठीमागील बाजूस पडझड झालेल्या स्थितीत एका मंदिराचे अवशेष काही वर्षांपासून पडून आहेत.

- शब्बीर शेखदेगलूर (जि. नांदेड) : तालुक्यातील येरगी येथे चालुक्यकालीन शिलालेख आढळला असून, या शिलालेखावर मंदिराला दान दिलेल्या साहित्याचा उल्लेख असल्याची माहिती पुरातत्त्व अभ्यासकांनी दिली.

येरगी या गावाच्या पाठीमागील बाजूस पडझड झालेल्या स्थितीत एका मंदिराचे अवशेष काही वर्षांपासून पडून आहेत. यात गर्भगृहाचे द्वार असून, अंतराळाचे दोन स्तंभ व सभामंडपाच्या चार स्तंभांवर मंदिर उभे आहे. येथील पुरातत्त्व अभ्यासक डॉ. कामाजी डक यांना हा शिलालेख आढळला. मंदिराच्या ललाटबिंबावर हा शिलालेख असून, तो लवकर नजरेत पडत नाही. द्वाराच्या ललाटबिंबावर गजलक्ष्मीचे शिल्प असून त्यावरील द्वारपट्टीवर हा शिलालेख पाच भागांमध्ये कोरला आहे. या द्वारास एकच स्तंभशाखा असून, त्याची उंची साधारणत: सहा फूट असून, रुंदी चार फूट आहे. बाजूला जालवातायन आहे. डॉ. कामाजी डक यांनी या शिलालेखाचे ठसे घेतले.

या हळ्ळेकन्नड शिलालेखाचे प्राथमिक वाचन कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथील प्रा. डॉ. बाळकृष्ण हेगडे यांनी केले. त्यानंतर अधिक सुस्पष्ट ठशांच्या साहाय्याने एच. जी. शशीधर यांनी शिलालेख वाचन पूर्ण केले. रविकुमार नवलगुंडा यांनीही थोडेसे विभिन्न वाचन उपलब्ध करून दिले. इतिहास संशोधक डॉ. नीरज साळुंखे यांनी संस्कृत व मराठी अर्थ स्पष्ट केला. या शिलालेखाचा काळ शोधण्याचा प्रयत्न केला असता, ११३८ मधील (चालुक्यकाळातील) हा शिलालेख असल्याचे संशोधक डॉ. नीरज साळुंखे यांनी सांगितले. येरगी हे चालुक्य काळातील अग्रहार होते. अग्रहार हे राजाने ब्राह्मणांना दिलेले करमुक्त गाव वतन असे. २३ जुलै ११२३च्या येरगी येथील शिलालेखात गोविंदरस याचा उल्लेख आला असून, त्याद्वारे या नव्या शिलालेखात त्याच्या मुलाचा उल्लेख असल्याने हा शिलालेख ११२३ नंतरचा आहे, हे नक्की. येरगी हे गाव होट्टलपासून दक्षिणेस तीन कि.मी. तर देगलूरपासून ११ कि.मी. अंतरावर असून, ऐतिहासिक व पुरातत्त्वीय दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

काय आहे या शिलालेखात...द्वारपट्टीवर पाच भागांत असलेल्या या शिलालेखाची सुरुवात स्वस्ती श्रीमद गोविंदरस पत्नी अशी केली आहे. दुसऱ्या ओळीत भ (च) मिकब्बे (पोचरसाची/ बाचरसाची आई) असा उल्लेख आहे; तर तिसऱ्या ओळीत राजकुमार पोचरसाने (बाचरसाने) केशवेश्वर मंदिराला दान दिल्याचा उल्लेख आहे. रस म्हणजे राजा, राजपुरुष होय. चौथ्या ओळीत उपासनेचा उल्लेख आहे; तर पाचव्या ओळीत जाळांद्रव (जालांद्र) असा उल्लेख आहे. जाळांद्र म्हणजे कन्नडमध्ये जालवातायन म्हणजेच जाळीदार खिडकी होय. एकंदरीत गोविंदरस व भ(च)मिकब्बे यांचा पुत्र पोचरस याने केशवेश्वर (मितेश्वर) मंदिराला जाळीदार खिडकी व अन्य साहित्य दान दिल्याचा उल्लेख शिलालेखात आहे.

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणNandedनांदेड