शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देगलूरमध्ये राहूनच केली स्पर्धा परीक्षेची तयारी; चार जणांची जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 18:21 IST

खडतर प्रयत्न केल्यास परिस्थितीदेखील बदलते हेच या चारही विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.

- शब्बीर शेखदेगलूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत देगलूरच्या ४ मुलांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. तिन जणांची कर सहाय्यक पदी  तर अन्य एकाची सहाय्यक सहकार अधिकारी या पदावर निवड झाली आहे. विशेष म्हणजे मध्यमवर्गीय व शेतकरी कुटुंबातील या चारही विद्यार्थ्यांनी जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी घातली आहे. खडतर प्रयत्न केल्यास परिस्थितीदेखील बदलते हेच या चारही विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.

हल्ली शिक्षण क्षेत्रामध्ये वाढलेली स्पर्धा पाहता अनेक पालक आपल्या पाल्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मुंबई- पुणे सारख्या मोठ्या शहरात पाठविण्यासाठी प्राधान्य देतात. मात्र देगलूर सारख्या ग्रामीण भागात राहूनही मध्यमवर्गीय व शेतकरी कुटुंबातील या चार विद्यार्थ्यांनी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका केंद्र येथे नियमित स्पर्धा परीक्षेची तयारी केली.  खडतर प्रयत्न, जिद्द बाळगल्यास अशक्य असे काहीच नाही नेमकं हेच या चार मुलांनी सिद्ध करून दाखवले आहे. 

या पदावर झाली निवड देगलूर शहरातील सचिन मारोतीराव कडलवार याने सहकार विभागाच्या परीक्षेत एन. टी. (ब) प्रवर्गातून राज्यात प्रथम स्थान मिळविले आहे. त्याची सहकार विभागात सहाय्यक सहकार अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. तर  श्याम मलकन्ना भंडरवार, नागेश यल्लप्पा निम्मलवार आणि राहुल शंकरराव गुडलावार यांची कर सहाय्यक पदासाठी निवड झाली आहे. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही निराश न होता या चारही जणांनी मिळविलेले यश देगलूर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

शहरात राहूनच केली तयारीदेगलूरचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात देगलूर सारख्या ग्रामीण भागातही गरीब व होतकरू मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या कार्यकाळात नगर विकास विभागा कडून 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. मागील अडीच वर्षांपूर्वी नगर परिषदेच्या माध्यमातून अत्याधुनिक सोयी सुविधा असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका येथील होतकरू विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे. तर माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार यांच्यासह अनेकांनी येथील विद्यार्थ्यांना लागणारी आवश्यक पुस्तके भेट स्वरूपात देऊन ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना एक प्रकारे प्रोत्साहन देण्याचे काम केले. 

गरिबांची मुले स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुणे सारख्या ठिकाणी जाऊ शकत नसल्याने त्यांच्यासाठी देगलूर येथेच अभ्यासिका केंद्र सुरू करावे यासाठी पुढाकार घेऊन नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका सुरू केली. आज या चारही विद्यार्थ्यांचे यश पाहता निश्चितच मला खूप आनंद झाला असून माझ्या कामाचे सार्थक झाले आहे.- मोगलाजी शिरशेटवार, माजी नगराध्यक्ष, देगलूर

टॅग्स :NandedनांदेडMPSC examएमपीएससी परीक्षा