शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
7
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
8
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
9
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
10
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
11
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
12
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
13
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
14
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
15
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
16
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
17
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
18
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
20
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी

श्रीक्षेत्र माहूरगडावरील नवरात्र महोत्सवानिमित्त प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 19:33 IST

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपिठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावर प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात होणार आहे.

श्रीक्षेत्र माहूर, दि. 16 - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपिठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावर प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात होणार आहे.या अनुषंगाने गडावर येणा-या भाविकांच्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधीर कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ सप्टेंबर रोजी येथे नवरात्र महोत्सव नियोजन आढावा बैठक घेण्यात आली.माहूरगडावर २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे. या काळात राज्यासह परराज्यांतून लाखो भाविक आई रेणुकेच्या दर्शनासाठी येतात. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे, भाविकांची कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना व यात्रेचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व रेणुकादेवी संस्थानच्या शासकीय व अशासकीय विश्वस्तांची जिल्हाधिकारी डोंगरे यांनी नियोजन आढावा बैठक बोलावली होती.यावेळी आरोग्य विभागाकडून रेणुकादेवी मंदिर, दत्तशिखर, अनुसयामाता मंदिर, बसस्थानक, टी पॉर्इंट अशा ५ ठिकाणी आरोग्यपथक राहणार असून ३ रुग्णवाहिकाही तैनात करण्यात येणार आहेत. नगरपंचायत कार्यालयाकडून ठिकठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी व फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाकडून भाविकांना गडावर जाण्यासाठी सुसज्ज ८० बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. महावितरण कंपनीकडून अखंड वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी नरेंद्र देशमुख, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जवाहार, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, डॉ.व्ही. एन. भोसले, अभियंता रवींद्र उमाळे, सचिन पांचाळ व सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.नवरात्र यात्राकाळात कुठल्याही कर्मचाºयांनी कर्तव्यात कसूर करु नये, काही समस्या उद्भवल्यास थेट मला संपर्क करा. कर्मचारी हयगय केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिला.मातृतीर्थ तलाव, सर्वतीर्थ व अन्य तलाव अथवा धबधब्याच्या ठिकाणी जीवरक्षक दलाची नेमणूक करुन ‘नो सेल्फी’ असे फलक लावावे, रेणुकादेवी ते दतशिखर मंदिरापर्यंत जाणाºया रस्त्यात काही ठिकाणी भूस्खलनाची शक्यता असल्याने अशा धोक्याच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावावे, मंदिरात दर्शनासाठी एकाच वेळा किती भाविक दर्शन घेऊ शकतात याची माहिती सा. बां. विभागाने पोलीस प्रशासनाला द्यावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी केली.प्रादेशिक परिवहन विभागाकडून यात्राकाळात नऊ दिवस अवैध प्रवासी वाहतुकीवर अंकुश ठेवला जाणार असून वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले.