शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड परिमंडळात नागरिकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून भरले १० कोटींचे वीज बिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 19:33 IST

डिजिटल इंडियाच्या मोहिमेस महावितरणचे वीज ग्राहक प्रतिसाद देत आहेत. महावितरण कंपनीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा घेत नांदेड परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक गटातील ४६ हजार वीजग्राहकांनी नोव्हेंबर  महिन्यात आॅनलाईन बिल भरण्याचा पर्याय स्वीकारुन १० कोटी ८७ लाख रुपयांचा वीजबिल भरणा महावितरणच्या खात्यात केला आहे.

नांदेड : डिजिटल इंडियाच्या मोहिमेस महावितरणचे वीज ग्राहक प्रतिसाद देत आहेत. महावितरण कंपनीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा घेत नांदेड परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक गटातील ४६ हजार वीजग्राहकांनी नोव्हेंबर  महिन्यात आॅनलाईन बिल भरण्याचा पर्याय स्वीकारुन १० कोटी ८७ लाख रुपयांचा वीजबिल भरणा महावितरणच्या खात्यात केला आहे.नांदेड परिमंडळांतर्गत नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यांचा समावेश असून आॅनलाईन बिल भरण्यास सर्वाधिक पसंती नांदेड मंडळातील वीज ग्राहकांनी दिली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीजग्राहकांनी आॅक्टोबरच्या तुलनेत वाढ करत नोव्हेंबर महिन्यात २९१९३ वीजग्राहकांनी ६ कोटी ३३ लाख रूपयांचा भरणा केला आहे. यामध्ये नांदेड शहर विभागाच्या १७७१७ वीजग्राहकांनी ३ कोटी ४६ लाख रुपयांचा भरणा आॅनलाईनचा वापर करुन केला आहे. तर नांदेड ग्रामिण विभागाच्या ४०८५ वीजग्राहकांनी ६४ लाख, देगलूर विभागाच्या ५५२७ वीजग्राहकांनी  १ कोटी २७ लाख आणि  भोकर विभागाच्या  ३८६४  वीजग्राहकांनी ८६ लाख रुपयांचा भरणा आॅनलाईन पद्धतीने केला आहे.

त्याचबरोबर परभणी मंडळातील ९२०९ वीजग्राहकांनी  २ कोटी २५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये परभणी विभाग क्रमांक एक मधील ५६३९ वीजग्राहकांनी १ कोटी ३५ लाख तर परभणी विभाग क्रमांक दोन मधील ३५७० वीजग्राहकांनी ९० लाख तसेच हिंगोली मंडळातील ७६३५ वीजग्राहकांनी २ कोटी ३० लाख रुपयांचा आॅनलाईन भरणा केला आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणNandedनांदेड