शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

धर्माबाद तालुक्यात ११ हजार ५९१ बालकांना पोलिओ डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:44 IST

तालुक्यातील शून्य ते पाच वर्षांपर्यंत बालकांना पोलिओ डोस देण्यात आला असून तालुक्यातील एकूण ७८ बुथ केंद्रांवर १२ हजार ५७७ उद्दिष्टापैकी ११ हजार ५९१ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला आहे.

धर्माबाद : तालुक्यातील शून्य ते पाच वर्षांपर्यंत बालकांना पोलिओ डोस देण्यात आला असून तालुक्यातील एकूण ७८ बुथ केंद्रांवर १२ हजार ५७७ उद्दिष्टापैकी ११ हजार ५९१ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला आहे.शहरातील २२ बुथ केद्रांवर ६२४९ उद्दिष्टापैकी ५६५१ बालकांना पोलिओ डोस दिला़ तर ग्रामीण ५६ बुथ केंद्रावर ६३२८ उद्दिष्टापैकी ५९४० बालकांना पोलिओ डोस देण्यात आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक खंदारे व ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख इकबाल यांनी दिली.तालुक्यात एकूण १२ हजार ५७७ बालके असून शहरात २२ बुथ आहेत़ ६२४९ बालके आहेत. ग्रामीण भागात ५६ बुथ असून ६३२८ बालके आहेत. ग्रामीण भागात १६० कर्मचारी होते.तर तीन मोबाईल पथक होते. प्रत्येक बुथवर तीन कर्मचारी होते. मान्यवरांच्या हस्ते पोलिओ डोस देऊन प्रारंभ करण्यात आला. तालुक्यातील जुन्नी येथे जि.प.कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी, बाभळी (ध) येथे पं.स.सभापती रत्नमाला जयराम कदम, करखेली येथे पं.स. उपसभापती चंद्रकांत वाघमारे यांच्या हस्ते पोलिओ डोस पाजवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्याधिकारी डॉ.अशोक खंदारे, डॉ.चिलकर, डॉ.अमोल चव्हाण, डॉ.नसीम बानो व लोकावाड, पाचपांडे, दुधमल कदम, श्रीमती वारेवार, कैवारे, बेटराज, नरवाडे आदी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, सेवक कर्मचारी काम पाहिले.धर्माबाद शासकीय रूग्णालयात न्यायाधीश गजभिये, सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरूल हसन, माजी जि.प.सदस्य गंगाधर तोटलोड यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस देऊन प्रारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख इकबाल, डॉ.संजय पोहरे, डॉ.पंडित, डॉ.प्रवीण काबंळे, डॉ.टाक, डॉ.परबते, डॉ.प्रदीप म्यॅकलवार, डॉ.जारिकोटे, सिस्टर महामुनी, कल्याणे, झुंबड, निलेवाड, आडे, लोणे, माडेवार, पेदे, सोनटक्के, सूर्यवंशी, गणलेवार, मोकमपल्ले, कानोडे, आगळे, चौहाण, देवकाबंळे, झगडे, येमुलवार, वाघमारे, सोमठाणे, बांगर, बेडके, चिगळे, गोपड, पठाण, दतुंलवार, काबंळे, लोट, आदी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, सेवक, कर्मचारी, डीएड , एनसीसी, एनएसएस स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.जी बालके शिल्लक राहिली असतील त्या बालकांना १२ ते १४ मार्चपर्यंत घरोघरी जाऊन पोलिओ डोस देण्यात येईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.मुखेड तालुक्यात मोहीम यशस्वीमुखेड : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़व्ही़आऱ मेकाने यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ रमेश गवाले व प्रा़ आ़ केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या सहाय्याने पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले़ मुखेड तालुक्यासाठी २६ हजार ६६० एवढे उद्दिष्ट लसीकरणासाठी होते़ त्यापैकी २४ हजार ८६१ बालकांना पोलिओ देण्यात आला़ १५० गावांमध्ये २३४ बुथ निर्माण करण्यात आले होते़ यासाठी ४४ अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, ११० आशा कार्यकर्त्या, ६० आरोग्यसेविका, १५ आरोग्य कर्मचारी, ४४ पर्यवेक्षक नेमण्यात आले होते़ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ रमेश गवाले, प्रा़ आ़ केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ शिवदास संगेवार, डॉ़जगदीश रावीकर, डॉ़विलास धनगे, डॉ़हणमंत मेकेवाड, डॉ़बालाजी गरूडकर, डॉ़माया कापसे, डॉ़आम्रपाली रावीकर, डॉ़राजू सुनेवाड, डॉ़ वर्षा कोरडे, व्यंकट माचनवाड, रेखा राहटकर, चंद्रकांत जाधव, राजकुमार ढवळे, नरसिंग गुरफळे, प्रवीण खलसे, शिवदास तोटेवाड आदींनी परिश्रम घेतले़

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यNanded zpनांदेड जिल्हा परिषद