पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:16 AM2021-07-25T04:16:51+5:302021-07-25T04:16:51+5:30

पन्नास हजारांसाठी विवाहितेचा छळ मुदखेड : शहरातील मदिनानगर भागात हॉटेल टाकण्यासाठी माहेराहून पन्नास हजार रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची ...

The policeman's bike was lengthened | पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी लांबविली

पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी लांबविली

Next

पन्नास हजारांसाठी विवाहितेचा छळ

मुदखेड : शहरातील मदिनानगर भागात हॉटेल टाकण्यासाठी माहेराहून पन्नास हजार रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींनी पीडितेला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. याप्रकरणी विमानतळ ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

अपघातात रोजगार सेवकाचा मृत्यू

धर्माबाद येथे ऑटोने दुचाकीला दिलेल्या धडकेत रोजगार सेवकाचा मृत्यू झाला. ही घटना २१ जुलै रोजी घडली. याप्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राजू नारायण तुरेराव (रा. जुन्नी, ता. धर्माबाद) हा युवक २१ जुलै रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच २६ एबी ८४८९) धर्माबाद येथून जुन्नी या गावाकडे जात होता. त्याचवेळी ऑटोने (क्र. एमएच २६ जी. ५२६२) क्रमांकाच्या ऑटोने तुरेराव यांच्या दुचाकीला धडक दिली. यात तुरेराव यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी किशन तुरेराव यांनी ठाण्यात तक्रार दिली.

मुक्रमाबादेत जुगार अड्ड्यावर धाड

मुक्रमाबाद शहरातील कॉलेज रोड भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. २३ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी रोख २९ हजार रुपये जप्त करण्यात आले. याप्रकरणी मुक्रमाबाद पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

मुदखेड शहरात हातभट्टीची दारू जप्त

मुदखेड शहरात रेल्वेच्या भिंतीलगत अनधिकृपतपणे विक्रीसाठी ठेवण्यात आलेली दोन हजार रुपयांची हातभट्टीची दारू पोलिसांनी पकडली, तर मारतळा ते नांदगाव पाटीजवळ १ हजार २४८ रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे.

Web Title: The policeman's bike was lengthened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.