शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताच्या उलट्या होवून उपचारादरम्यान पोलीस नाईकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 11:41 IST

११ डिसेंबर रोजी सायंकाळी राहते घरी अचानक रक्ताच्या उलट्या झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले

नांदेड: नांदेडच्या 'हडको' परिसरातील मुळ रहिवासी व सोनखेड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या ३६ वर्षीय पोलीस नाईक अमोल उगवे (बक्कल नंबर ४९८) यांचा रक्ताच्या उलट्या होवून उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १३ डिसेंबर रोजी नांदेड शहरातील एका खाजगी रूग्णालयात घडली आहे. 

पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या 'सिडको' वसाहतीअंतर्गत असलेल्या एनडी. ए- ११९ 'हडको' परिसरातील मुळ रहिवासी असलेले अमोल भाऊलाल उगवे (बक्कल नं.४९८) हे सोनखेड (ता. लोहा जि. नांदेड) येथील पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून नेमणुकीला होते. दरम्यान, पो.ना. अमोल उगवे यांना ११ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजे दरम्यान त्यांच्या राहते घरी अचानक रक्ताच्या उलट्या होवू लागल्या. त्याचवेळी, नातेवाईकांनी पोलीस नाईक अमोल उगवे यांना उपचाराकरिता नांदेड शहरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान १३ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेदरम्यान, डॉक्टरांनी पो. ना. अमोल उगवे यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले, अशी माहिती ठाणे अंमलदार प्रविण केंद्रे व मदतनीस महिला पो. कॉ. ज्योती आंबटवार यांनी दिली आहे. 

याप्रकरणी अविनाश भाऊलाल उगवे (रा. एनडी. ए-११९, हडको, नांदेड) यांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल शेख जावेद हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. विशेष बाब म्हणजे, पोलीस नाईक अमोल उगवे यांच्या पार्थिवावर १३ डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठवाजेदरम्यान, पोलीस दलाच्या वतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

याप्रसंगी डीवायएसपी. डॉ. सिध्देश्वर भोरे व नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचेसह 'रेल्वे'चे पोलीस निरीक्षक सुरेश  उनवणे, सोनखेड येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पो. नि. महादेव मांजरमकर, पोउपनि. चंदन परिहार तसेच नांदेड पोलीस दलातील असंख्य पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. प्रारंभी, 'पोलीस' दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून पो. ना. अमोल उगवे यांना शोकसलामी देण्यात आली. त्याचवेळी, नांदेड पोलीस दलाच्यावतीने व नवीन नांदेडातील विविध राजकीय पक्षाचे तथा सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पो. ना. दिवंगत अमोल उगवे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आईवडील व दोन भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसNandedनांदेड