शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहतींचे रुपडे पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:52 IST

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेवून अहोरात्र डोळ्यांत तेल घालून सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी पाडणाऱ्या पोलीस कर्मचा-यांचे कुटुंब मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस वसाहतीत मोडकळीस असलेल्या निवासस्थानांमध्ये जीव मुठीत घेवून राहत आहेत़

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक संजय जाधव २०३ निवासस्थानांसाठी मिळाले २ कोटी ६१ लाख रुपये

नांदेड : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेवून अहोरात्र डोळ्यांत तेल घालून सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी पाडणाऱ्या पोलीस कर्मचा-यांचे कुटुंब मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस वसाहतीत मोडकळीस असलेल्या निवासस्थानांमध्ये जीव मुठीत घेवून राहत आहेत़ गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचा-यांच्या या समस्येकडे कुणीही गांभीर्याने पाहिलेच नाही़ त्यात आता पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीतून या घरांच्या डागडुजीसाठी २ कोटी ६१ लाख रुपये मंजूर झाले आहेत़ त्यामुळे पोलीस निवासांना आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत़जिल्ह्यात आजघडीला पोलीस दलात तीन हजारांवर कर्मचारी कार्यरत आहेत़ ड्युटीच्या वेळा अन् अवेळी जेवण, पुरेशी झोप न मिळणे यामुळे पोलीस कर्मचारी अगोदरच तणावात आयुष्य जगत असतात़ प्रकृतीकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांना अनेक आजारही बळावतात़ दिवसभर कर्तव्यावरुन घरी गेल्यानंतरही मात्र घराची अवस्था पाहता त्यांना शांतपणे झोप लागणे दुर्लभच ! मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहत इमारतीचा कोणता भाग कधी कोसळेल आणि अपघात होईल याची शाश्वती नसल्यामुळे पोलीस कर्मचाºयांचे कुटुंब जीव मुठीत घेवूनच राहतात.त्यातही गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस वसाहतींची ड्रेनेजलाईन, सांडपाण्याची व्यवस्था याची अवस्थाही फार वाईट आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात येतो़ परंतु केवळ अधिकाºयांच्या निवासांना झळाळी देण्यात येत असल्यामुळे इतर कर्मचाºयांच्या समस्या झाकोळल्या जातात़ असा आजपर्यंतचा कर्मचाºयांना अनुभव आलेला आहे़ अनेक ठिकाणी स्लॅब कोसळू नये म्हणून त्याला लाकडाचा आधार देण्यात आला आहे़त्यात काही दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी या मोडकळीस आलेल्या कर्मचाºयांच्या निवासस्थानांची पाहणी केली होती़ त्याचवेळी त्यांनी या घरांची दुरुस्ती करण्यास प्राधान्य दिले़ त्यानंतर या घरकुलांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून २ कोटी ६१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत़ या निधीतून जिल्हाभरातील कर्मचाºयांच्या २०३ आणि १० अधिका-यांच्या निवासस्थानांची डागडुजी करण्यात येणार आहे़ त्याचबरोबर पोलीस वसाहतीतील ड्रेनेज आणि इतर समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत़ त्यामुळे तब्बल २० वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस कर्मचा-यांच्या निवासस्थानांना ‘अच्छे दिन’ येणार आहेत़

  • पोलीस कर्मचा-यांच्या निवासांची अवस्था अतिशय दयनीय आहे़ जिल्हाभरातील पोलीस निवासांच्या दुरुस्तीच्या आणि नवीन बांधकामांच्या विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे़ पोलीस कर्मचा-यांना घरात गेल्यानंतर शांतपणे झोप लागावी, त्यांच्या कुटुंबातील वातावरण आनंदी रहावे, यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबविण्यात येत आहेत़ पोलीस ठाण्यांमध्येही कर्मचा-यांच्या मनोरंजनासाठी काय करता येईल ? या दृष्टीनेही विचार सुरु असल्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव म्हणाले़

४पोलीस वसाहतीत पोलीस कर्मचाºयाला एक खोली, स्वयंपाकगृह आणि शौचालय असते़ तर हेडकॉन्स्टेबल आणि अधिकाºयांना दोन खोल्या, स्वयंपाकगृह आणि शौचालय असते़ ए,बी आणि सी असे निवासांचे वर्गीकरण करण्यात येते़ पोलीस वसाहतीतील सुविधांबाबत अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येतो़ परंतु, कर्मचाºयांच्या निवासस्थानांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्षच करण्यात येते़

टॅग्स :NandedनांदेडHomeघरNanded policeनांदेड पोलीस