शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विष प्राशन करून तरुण ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:08 IST

वैतागून पार्डी (खु) येथील एका विवाहित युवकाने सासरच्या मंडळीसोबत झालेल्या वादानंतर विष प्राशन करुन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना ही बाब लक्षात येताच लगेच त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या दरम्यान घडली़ परंतु, या प्रकारामुळे पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ झाली़

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : वैतागून पार्डी (खु) येथील एका विवाहित युवकाने सासरच्या मंडळीसोबत झालेल्या वादानंतर विष प्राशन करुन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना ही बाब लक्षात येताच लगेच त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या दरम्यान घडली़ परंतु, या प्रकारामुळे पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ झाली़किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पार्डी खुर्द येथील रहिवासी प्रशांत सुरेश दहीफळे यांचा दोन वर्षांपूर्वी तेलंगणा राज्यातील नळेगाव मंडळ इच्चोडा येथील डोंगरे कुटुंबातील मुलीशी विवाह झाला होता. दरम्यान, प्रशांत आणि सासुरवाडी यांच्यात नेहमीच बेबनाव होता़ अशातच एक मुलगासुद्धा झाल्याचे सांगण्यात आले. सासुरवाडीची मंडळी पत्नीला पाठवत नसल्यामुळे तो निराश झाला होता़ याच निराशेतून त्याने शुक्रवारी दुपारी दुपारी अडीच वाजताचे दरम्यान किनवटात विष प्राशन केले़विष प्राशन करुन त्यानंतर त्याने थेट पोलीस ठाणे गाठले. ठाण्यात आल्यावर त्याच्या हालचालीवरुन पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे यांना संशय आला़ त्यांनी प्रशांतची विचारपूस केली असता, त्याने विष प्राशन केल्याचे सांगितले़ त्यामुळे काहीवेळ पोलीसही चक्रावले होते़ त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याला गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तात्काळ उपचार केल्याने त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ. सना मेहरीन यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव चौधरी यांनी रुग्णालयात जाऊन प्रशांतची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

  • विशेष म्हणजे,या आठवड्यातील आत्महत्येचा प्रयत्न ही दुसरी घटना आहे़ ८ आॅक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या कार्यालयात इनामी जमिनीसाठी दिलीप उबाळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याबाबत पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांना विचारले असता तो विष प्राशन करून आला होता़ त्याच्या सासुरवाडीकडील अडचणीमुळे त्याने विष घेतले असावे असे ते म्हणाले़

सासुरवाडीच्या लोकांना चांगले ठेचा...प्रशांतने विष पिण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती़ ही चिठ्ठी त्याने जमादार पांढरे यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर टाकून सासरच्या मंडळींचा उल्लेख केला आहे़ चिठ्ठी पोस्ट केल्यानंतर त्याखाली त्याने टाईप करुन मेसेज लिहिला़ तुम्हाला तुमच्या मित्राची शपथ साहेब या लोकांना फार ठेचा असे लिहिले आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीसhospitalहॉस्पिटल