शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

आजपासून नांदेडमध्ये प्लास्टिक बंदी; विशेष पथकाची राहणार नजर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 17:38 IST

शहरात नववर्षाच्या प्रारंभापासून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालण्यात आली असून विशेष पथकाद्वारे अशा प्लास्टिक पिशव्यांचा शोध घेतला जाणार आहे.

नांदेड : शहरात नववर्षाच्या प्रारंभापासून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालण्यात आली असून विशेष पथकाद्वारे अशा प्लास्टिक पिशव्यांचा शोध घेतला जाणार आहे.

राज्य शासनाच्या धोरणानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर, विक्रीवर, उत्पन्नावर बंदी घालण्यात आली आहे.  प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाची होणारी अपरिमित हानी टाळण्यासाठी राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. नववर्षाच्या प्रारंभापासून शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍या, विकणार्‍यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ही कारवाई ५ हजार, १० हजार व १५ हजार रुपये दंड स्वरूपात राहणार आहे.तर दुसर्‍या टप्प्यात गुन्हे    दाखल करण्यात येतील, असेही आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

शहरात संपूर्ण प्लास्टिक बंदीचा निर्णयही महापालिकेच्या १९ डिसेंबरच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही केली जाणार आहे. १ एप्रिल २०१८ पासून शहरातून सर्व प्रकारच्या प्लास्टिक कॅरिबॅगच्या उत्पादनावर, विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे.  या तीन महिन्यांच्या कालावधीत महापालिका प्लास्टिक निर्मूलनाबाबत जनजागृती करणार आहे. आगामी काळात मनपा हद्दीतील कोणताही व्यापारी, नागरिक, संस्थांनी प्लास्टिक पिशव्या खरेदी-विक्री, वापर व उत्पादन करु नये, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNandedनांदेड