शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पाईप प्रकरणी इतवारा पोलीस नांदेड महापालिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:38 IST

पाईप चोरी प्रकरणात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही या प्रकरणात कोणताही गुन्हा बुधवारी रात्री उशिरापर्यंत दाखल झाला नाही. त्याचवेळी महापालिकेत बुधवारी इतवारा पोलिसांनी या प्रकरणाची सखोल माहिती घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पाईप चोरी प्रकरणात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही या प्रकरणात कोणताही गुन्हा बुधवारी रात्री उशिरापर्यंत दाखल झाला नाही. त्याचवेळी महापालिकेत बुधवारी इतवारा पोलिसांनी या प्रकरणाची सखोल माहिती घेतली.पाईप चोरी प्रकरण उघडकीस येऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही या प्रकरणातील नेमके आरोपी कोण? याचा उलगडा ना पोलीस करु शकले, ना महापालिका. या दोन्ही विभागाकडून ‘पहले आप, पहले आप’ची भूमिका अदा केली जात आहे. या प्रकरणात तक्रार कोण द्यायची? हाच प्रश्न अद्यापही सुटला नाही. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता या सर्व बाबींचा उलगडा होणे आवश्यक आहे. पोलीस अधीक्षक मीना यांनी मंगळवारी रात्री या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश इतवारा पोलिसांना दिले होते. या आदेशानुसार बुधवारी सकाळी इतवारा पोलीस महापालिकेत दाखल झाले. आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी या प्रकरणात चर्चा झाल्यानंतर गुन्हा दाखल होईल, अशी अपेक्षा होती. मात्र रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसांनी पाणीपुरवठा कामावर जमिनीत टाकलेले पाईप पोलिसांच्या ताब्यात द्यावे, अशी सूचना महापालिकेला केली आहे. महापालिकेच्या चौकशीमध्ये पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात आलेले काही पाईप चोरीचे असल्याचे स्पष्ट झाले होते. चोरीचे पाईप असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच हे काम करणाऱ्या सोहेल कन्स्ट्रक्शनवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई महापालिकेने केली होती.महापालिकेचे उपअभियंता रफतउल्ला खान व मनपाचे काही कर्मचारी बुधवारी दिवसभर इतवारा पोलीस ठाण्यात उपस्थित होते.कंत्राटदाराने सादर केलेले पाईपांचे देयक देणाºया विजय इंजिनिअरिंग सर्व्हीसेसने पुरवठा केलेल्या ५१ पाईपाचा ना पोलिसांना शोध लागत आहे ना महापालिकेला. महापालिकेने १४ मार्च रोजी या प्रकरणात चौकशी केली असता ५१ पाईप पुरवठा केल्याचे सांगण्यात आले होते. ते ५१ पाईप खुद्द विजय इंजिनिअरिंग सर्व्हीसेसच्या प्रतिनिधींनी वेगळे केले होते. त्यातील ३४ पाईप देयकाप्रमाणे होते. मात्र मात्र उर्वरित १७ पाईपांचा उलगडा अद्यापही झाला नाही. १५ मार्चनंतर पाईप पुरवठा करणाºया ‘विजय’ नेही या प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे.या प्रकरणात इतवारा पोलिसांचे दोन पथके मेदक आणि आदिलाबादला माहिती घेण्यासाठी रवाना झाले आहेत.पाईप चोरी प्रकरण विधानसभेत?मागील दोन आठवड्यांपासून चर्चेत असलेल्या पाईप चोरी प्रकरणात गुन्हा दाखल झाला नसल्याबाबत या विभागाचे प्रतिनिधित्व करणाºया आ. हेमंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा प्रकार आंतरराज्यीय टोळीच्या माध्यमातूनच होत असल्याच्या अनेक बाबी पुढे येत असताना गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्याचवेळी २३ मार्च रोजी विधानसभेत पाईप चोरी प्रकरणात लक्षवेधी मांडणार असल्याचेही आ. पाटील म्हणाले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाCrimeगुन्हा