शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जाती-पातीचे राजकारण जनता हाणून पाडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:47 IST

पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर विरोधकांनी नांदेडसाठी काय केले? हे सांगायला हवे. मात्र जनतेचे खरे मुद्दे टाळून प्रचारसभांत निराधार टीकाटिप्पणी केली जात आहे. नांदेड जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास कोणी केला? याची मतदारांनाही जाणीव आहे.

ठळक मुद्देचव्हाण : नांदेडकर पाठीशी याचा विश्वास

नांदेड : पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर विरोधकांनी नांदेडसाठी काय केले? हे सांगायला हवे. मात्र जनतेचे खरे मुद्दे टाळून प्रचारसभांत निराधार टीकाटिप्पणी केली जात आहे. नांदेड जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास कोणी केला? याची मतदारांनाही जाणीव आहे. या निवडणुकीत मतदार जाती-पातीचे राजकारण हाणून पाडतील, असा विश्वास व्यक्त करीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे अशोकराव चव्हाण म्हणाले.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात विविध समाजघटकांशी चव्हाण यांनी रविवारी संवाद साधला. यावेळी व्यंकट मुदीराज, दीपाली मोरे, बालाजी मद्देवाड, छगन पाटील, सिद्धेवर पिटलेवार, बालाजी बोईनवाड, शेख गफार, रमेश यादव आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री असताना आदिवासी कोळी तसेच भोई समाजबांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याचे सांगत इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता तुमच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल, असा शब्द चव्हाण यांनी दिला. आदिवासी विरुद्ध मन्नेरवारलू आणि आदिवासी विरुद्ध कोळी असा विनाकारण वाद निर्माण केला जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. विद्यमान भाजप सरकार दलित, अल्पसंख्याकांच्या विरोधातील आहे. त्यामुळे या सरकारविरोधात मतदानाच्या माध्यमातून आवाज उठवा, असे आवाहनही त्यांनी केले. भोकरमधील लघळूदमध्ये समाजबांधवांचा खून होतो. परंतु अद्यापही त्याचा तपास लागला नसल्याचे सांगत या सरकारच्या काळात पोलीस यंत्रणाही कुचकामी ठरल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. या सरकारला मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आदिवासी कोळी समाज, भोई समाज, मच्छीमार संघटना तसेच ख्रिस्ती बांधवांनी चव्हाण यांना जाहीर पाठिंबा देत काँग्रेसच्याच पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.अख्खी भाजपा भेदरलीनरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासह पियुष गोयलसह अख्खी भाजपाची नेतेमंडळी नांदेडमध्ये येते. यावरुन भाजपा किती भेदरलेली आहे हे स्पष्ट होते. मात्र हे नेते येवूनही त्यांचा उपयोग होणार नाही. कारण जिल्ह्याचा विकास कोणी केला? याची जाणीव नांदेडकरांना आहे. कामे आम्ही करायची आणि श्रेय दुसरे लाटणार हे आता चालणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण