शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात प्लास्टिक बंदीचा भंग करणाऱ्या १९ व्यापा-यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:48 IST

महापालिकेने प्लास्टिक बंदी निर्णयाच्या अंमलबजावणीस पुन्हा एकदा नव्याने प्रारंभ केला असून शहरात बुधवारी वेगवेगळ्या भागात १९ व्यापा-यांना प्लास्टिक वापरल्याप्रकरणी ९५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेने प्लास्टिक बंदी निर्णयाच्या अंमलबजावणीस पुन्हा एकदा नव्याने प्रारंभ केला असून शहरात बुधवारी वेगवेगळ्या भागात १९ व्यापा-यांना प्लास्टिक वापरल्याप्रकरणी ९५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.प्लास्टिक बंदीचा निर्णय २३ जून रोजी राज्यभरात लागू झाल्यानंतर नांदेडमध्येही महापालिकेने मोठ्या कारवाया केल्या होत्या. कोट्यवधींचे प्लास्टिक जप्त केले. त्यानंतर शासनस्तरावर प्लास्टिक वापराबाबत काही घटकांना सूट दिल्यानंतर नांदेडमध्ये ही कारवाई थंडावली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवारपासून महापालिकेने शहरात प्लास्टिक विरोधी मोहीम हाती घेतली. प्लास्टिक वापरणाºया किराणा दुकानदारांना दंड ठोठावण्यात आला. प्रभाग १५, १७, १८ मध्ये ही कारवाई करण्यात आली होती.बुधवारी पुन्हा महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांसमवेत शहरातील विविध भागात तपासणी मोहीम राबविली. शहरातील ५५ दुकानांची तपासणी बुधवारी केली.त्यावेळी १९ व्यापा-यांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले. त्यांच्याकडून ९५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.बुधवारी झालेल्या कारवाईत प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सहायक आयुक्त धपाळे यांच्यासह त्यांचे सहकारी तसेच महापालिकेचे सहायक आयुक्त गुलाम सादिक, क्षेत्रिय अधिकारी अविनाश अटकोरे, संजय जाधव, सुधीर इंगोले, शिवाजी डहाळे, डॉ. मिर्झा बेग, स्वच्छता निरीक्षक, महापालिकेचे पोलिस पथक, मनपा कर्मचारी सहभागी होते. बुधवारच्या कारवाईत १०० किलो कॅरिबॅगचा साठा पथकाने जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान व्यापारी व मनपा पथकात वादही झाले. शहरवासियांनी बाजारात निघताना कापडी पिशवी घेवून निघावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.... नागरिकांवरही कारवाईप्लास्टिक बंदी निर्णयाअंतर्गत प्लास्टिक वापरणाºया नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला प्रदान करण्यात आले आहेत. आतापर्यंत महापालिकेने प्लास्टिक वापरल्याप्रकरणी व्यापा-यांना दंड ठोठावला आहे. यापुढे आता शहरात ज्या नागरिकांकडे प्लास्टिक आढळेल, त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्याचा ईशारा देण्यात आला आहे. महापालिकेकडून प्लास्टिक बंदीची कारवाई दररोज केली जाणार आहे. त्यात नागरिकांनी कापडी पिशवीचा वापर करावा अन्यथा दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी