शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘खंडणी दे, नाही तर गोळी घालू’; नांदेडमध्ये रिंदा गँग पुन्हा सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 13:27 IST

Rinda gang reactivated in Nanded शहरात पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणे सुरु

ठळक मुद्देपोलिसांनी रिंदा गँगचे ६० हून अधिक सदस्य पकडले होते. त्यानंतर काही महिने शहरात शांतता होती.

नांदेड : शहरात रिंदा गँग पुन्हा एकदा सक्रिय झाली असून ‘खंडणी दिली नाही तर गोळी घालू’ अशी धमकी एका व्यापाऱ्याला देण्यात आली आहे. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

शहरात कुख्यात हरविंदरसिंह रिंदा याने काही महिन्यांपूर्वी प्रतिष्ठीत व्यापारी, डॉक्टर यांना जीवे मारण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी वसूल केली होती. या प्रकरणात पोलिसांनी रिंदा गँगचे ६० हून अधिक सदस्य पकडले होते. त्याचबरोबर मोक्का अंतर्गत अनेकांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर काही महिने शहरात शांतता होती. परंतु, आता पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणे सुरु झाले आहे. 

१० आॅक्टोबर रोजी इंदरजितसिंह यांच्या कापड दुकानासमोर दिलबागसिंह लखविंदरसिंह रंधवा हे बोलत थांबले होते. त्याचवेळी त्यांच्याजवळ सोनू गील आणि लालो हे दोघे जण आले. सोनू गील याने दिलबागसिंह यांची कॉलर पकडून रिंधाच्या नावाने खंडणी मागितली. यावेळी दिलबागसिंह याने त्याच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. त्यामुळे चिडलेल्या लालो याने खंडणी न दिल्यास गोळी घालण्याची धमकी दिली.  दिलबागसिंह यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडPoliceपोलिस