शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी-मुदखेड दुहेरीकरणाचे काम निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:19 IST

परभणी ते मुदखेड या ८१ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम निम्म्यावर आले आहे. या कामावर मागील तीन वर्षांत २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकामाला गती मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

नांदेड : परभणी ते मुदखेड या ८१ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम निम्म्यावर आले आहे. या कामावर मागील तीन वर्षांत २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.मराठवाड्याच्या दळणवळण विकासात महत्त्वाचे पाऊल मनमाड ते मुदखेड दुहेरीकरण ठरणार आहे. मार्च २०१९ अखेर हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे विभागाने ठेवले आहे.परभणी ते मुदखेड या ८१.४० किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण २०१२-१३ मध्ये मंजूर झाले. याचा अंदाजित खर्च ३९० कोटी ६० लाख रुपये होता. गेल्या तीन वर्षांत यापैकी २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यापैकी एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ यावर्षी ५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. परभणी ते मुदखेड या ८१.४० किलोमीटर मार्गापैकी परभणी ते मिरखेल हा १७ किलोमीटर चा मार्ग जून २०१७ मध्येच पूर्ण होऊन वापरात येत आहे. मुगट ते मुदखेड या ९.३ किलोमीटर या मार्गाचेही दुहेरीकरण पूर्ण होऊन सी.आर.एस.च्या परवानगीने १० आॅक्टोबरपासून वापरात येत आहे. लिंबगाव - नांदेड- मालटेकडी या १४.१० किलोमीटरच्या मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे असून १७ आॅक्टोबर २०१८ पासूनच प्रवाशांच्या सोयीकरिता वापरात येत आहे. या मागार्मुळे रेल्वेगाड्यांची गती वाढली आहे.परभणी ते मुदखेड या ८१.४० किलोमीटर मार्गापैकी ४०.४ किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. त्याचवेळी उर्वरित मिरखेल ते लिंबगाव (३०.९० किमी) आणि मालटेकडी ते मुगट (१०.० किमी) या उरलेल्या ४१.०० किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरणाचे काम मार्च -२०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परभणी ते मुदखेड या मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण केल्यानंतर मराठवाड्यातील माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक यामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. उद्योग व्यवसायामध्येसुद्धा भविष्यात अपेक्षित प्रगती साधता येईल. आजघडीला ३५-४० रेल्वे या एकल मार्गावरून धावतात. दुहेरीकरणानंतर या मार्गावरून रेल्वेगाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या मार्गाच्या दुहरेकरणासोबतच विद्युतीकरणाचे कामही नांदेड विभागात लवकरच सुरु होणार आहे. ते कामही येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दुहेरीकरणासाठीच्या प्रमुख बाबी रेल्वे विभागाने जवळपास पूर्ण केल्या आहेत. त्यामध्ये जमीन संपादन, केबल कार्य, मोठे आणि छोटे पुलांचे बांधकाम, रिले रूम्स आणि केबिन, इत्यादी पूर्ण करण्यात आले आहेत. प्रवासी सुविधा जसे- उंच प्लॅटफॉर्म, बेंचेस, पाणी सुविधा इत्यादीचे काम सर्व रेल्वेस्थानकांवर पूर्ण झाले आहे. फक्त काही रेल्वे मार्गाशी संबंधित काही किरकोळ कामे ग्लू ज्योयिंटस , ट्रेक लायनिंग , इत्यादी शिल्लक आहेत . ३ छोटे पूल, एका भुयारी पुलाचे काम सुरू आहे.प्रधानमंत्री कार्यालयाकडून या कामाच्या प्रगतीकडे लक्ष ठेवल्या जात आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल हेही या मार्गाच्या दुहेरीकरण कामाचा आढावा घेत आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडparabhaniपरभणीrailwayरेल्वे