शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

परभणी कृषी विद्यापीठ आणणार कापसाचे बीटी बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 1:41 AM

परभणी कृषी विद्यापीठाने कापसाचे एनएच-४४ बीजी-२ हे बीटी वाण बाजारात आणण्याचा निर्णय घेतला असून याबाबत महाबीजसोबत नुकताच करार करण्यात आला आहे़ विद्यापीठाचे हे वाण येणा-या वर्षात सर्वत्र उपलब्ध होणार आहे़

ठळक मुद्देमहाबीजसोबत करार : सार्वजनिक क्षेत्रातील पहिले वाण ठरणार

विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : परभणी कृषी विद्यापीठाने कापसाचे एनएच-४४ बीजी-२ हे बीटी वाण बाजारात आणण्याचा निर्णय घेतला असून याबाबत महाबीजसोबत नुकताच करार करण्यात आला आहे़ विद्यापीठाचे हे वाण येणा-या वर्षात सर्वत्र उपलब्ध होणार आहे़

राज्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते़ महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ व खानदेशमध्ये कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात होते़ कापूस उत्पादक शेतकरी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या नांदेड-४४ या संकरित वाणाला मोठा प्रतिसाद देत होते़ देशभरात या वाणाची जवळपास ५५ ते ६० टक्के लागवड होत असे़ मात्र २००२ च्या सुमारास देशात बीटी कापसाची लागवड सुरु झाली़ त्यानंतर विद्यापीठाचे नांदेड-४४ हे वाण मागे पडले़ बीटी तंत्रज्ञानामुळे २००२ नंतर राज्यातील सरासरी कापूस लागवड क्षेत्र ४६ टक्क्यांनी वाढले़

सरासरी उत्पादकतेतही ६४ टक्क्यांहून अधिकची वाढ झाली़ त्यामुळे राज्यातील कापसाच्या एकूण सरासरी उत्पादनामध्ये १८३ टक्के वाढ झाली़ कापसाचे देशातील सरासरी उत्पादनही १७५ टक्क्यांवर पोहोचले़ त्यामुळेच २००२ पर्यंत कपाशीचा प्रमुख आयातदार असलेला भारत मागील काही वर्षात निर्यातदार राष्ट्र म्हणून पुढे आला़एनएच-४४ बीजी-२, या बीटी वाणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने महाबीज सोबत नुकताच करार केला असूऩ या संदर्भातील हक्क हस्तांतरणाचे कामही पूर्ण झाले आहे़ २०१७-१८ मध्ये विद्यापीठाचे हे बीटी वाण उपलब्ध होणार असून २०१८-१९ या वर्षापासून ते देशभरात बाजारपेठेत उपलब्ध राहील़सदर वाण खाजगी कंपन्यांच्या तुलनेत काहीसे स्वस्त असेल, असे नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रातील प्रा़ अरविंद पांडागळे यांनी सांगितले़शेतक-यांसाठी मोठा दिलासा...कपाशीवर चार प्रकारच्या अळ्यांचा प्रार्दुभाव होतो़ यात हिरवी बोंड, ठिपक्यांची, लष्करी आणि गुलाबी म्हणजेच शेंदरी बोंडअळी या चारही अळ्यांवर मात करण्याची क्षमता बीटी कॉटनमध्ये होती़ त्यामुळेच २००२ पासून २०१६ पर्यंत गुजरात वगळता देशाच्या इतर भागात कपाशीवर रोगाचा फारसा प्रार्दुभाव झालेला नव्हता़ मात्र इतर अळीच्या तुलनेत शेंदरी बोंडअळी बोंडामध्ये शिरुन बोंड गीळंकृत करते़ गुजरातमध्ये २०१५ मध्ये याच शेंदरी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते़ हेच लोण यावर्षी महाराष्ट्रातही धडकले़ गुलाबी बोंडअळीने कापसाचे पीक फस्त केल्याने सध्या महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आला आहे़ अशा स्थितीत कृषी विद्यापीठाचे हे नवे बीटी वाण येणाºया काळात शेतक-यांसाठी दिलासादायक ठरणार आहे़खिजर बेग म्हणतात...दीर्घ कालावधीच्या वाणाची लागवड केल्याने शेंदरी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले़ अशा स्थितीत कुलगुरु डॉ़ बी़वेंकटेश्वरलू यांच्या पुढाकाराने येत असलेले विद्यापीठाचे बीटी वाण शेतकºयांसाठी दिलासादायक ठरेल़- डॉ़ खिजर बेगकापूस विशेषतज्ज्ञ,कापूस संशोधन केंद्र, नांदेड