शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

सांगा मायबाप जगावं कस ? मुलांप्रमाणे जोपासलेली पपईची बाग वादळाच्या तडाख्याने भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 18:22 IST

मनाठा येथील काही शेतकऱ्यांनी हटके प्रयोग करत शेतात पपईची लागवड केली.

हदगाव : अचानक वातावरणात बदल झाल्याने मनाठा येथे सोसाट्याचे वादळवारे वाहू लागले.यामुळे अनेकांची धावपळ उडाली. मात्र याचा मोठा फटका शेतीला बसला आहे. शेतकऱ्याने मुलांप्रमाणे जोपासलेली पपईची बाग पाच मिनिटांच्या वादळाने भुईसपाट झाल्याची घटना गुरुवारी ( दि. १८ ) सायंकाळी घडली. निसर्गाच्या या फटक्याने शेतकरी हतबल झाला आहे.

मनाठा येथील काही शेतकऱ्यांनी हटके प्रयोग करत शेतात पपईची लागवड केली. श्रीराम सिताराम राठोड यांची गट क्रमांक ३४१ मध्ये दोन हैक्टर जमीन आहे. संयुक्त कुटुंब असल्याने १३ लोकांचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे.  पारंपारिक पीक सोडून त्यांनी मागील वर्षी मार्चमध्ये शेतीत काहीसा वेगळा प्रयोग केला. बंगरुळ येथून त्यांनी ७०० पपईची रोपे आणून १ एकर शेतात लावली. पपई येईपर्यंत त्यांनी यावर ४० ते ५० हजार रुपये खर्च केले. दिवाळीपासून त्यांनी फळांची विक्री त्यांनी सुरू केली. गावात फिरुन आठवडी बाजारात ते पपई विकु लागले. एका झाडाला ३० ते ४० फळे लागली. यातून प्रती झाड ७०० -८०० रुपये मिळण्याचा त्यांचा अंदाज होता. 

गुरुवारी सायंकाळी राठोड कुटुंब शेतात जेवायला बसण्याच्या तयारीत होते. यावेळी अचानक वातावरण बदले आणि वादळ सुरु झाले. पुढच्या ५ ते १० मिनिटांमध्ये पपईची ३०० झाडांची संपूर्ण बाग कोलमडून पडली. मुलाप्रमाणे जोपासना केलेली झाडे उन्मळून पडत असतानाही निसर्गापुढे शेतकरी हतबल होता. राठोड कुटुंब तसेच ताटावरुन उठले. उन्मळून पडत असलेल्या बागेकडे पाहत त्यांच्या डोळ्यात पाणी तरारळे. दरम्यान, याच बागेची जोपासना करताना राठोड यांच्या मुलाला विजेचा धक्क्का बसला होता. कर्ज काढून उपचार करत राठोड यांनी त्याला वाचवले. पपईच्या विक्रीतून कर्ज फेडू असे त्यांचे नियोजन होते. मात्र, आता वादळाने सारेच नष्ट केल्याने कर्ज कसे फिटणार या विवंचनेत राठोड कुटुंबीय आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रNandedनांदेड