शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीची वारी सायकलवरून! नांदेडहून ३२१ कि.मी.चा श्रद्धेचा पर्यावरणमित्र प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:19 IST

सायकलिस्ट ग्रुपच्या माध्यमातून १४ जण गुरुवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. विशेष म्हणजे यामध्ये चार तरुणींचा समावेश आहे.

नांदेड : आषाढी एकादशीची वारी म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्य यांचा संगम. या परंपरेला नव्या पिढीचा सामाजिक आणि पर्यावरणपूरक स्पर्श देत, नांदेडमधील काही तरुण-तरुणींनी यंदा सायकलवरून पंढरपूर वारी करण्याचा संकल्प केला आहे. तब्बल ३२१ किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करून विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ही चमू गुरुवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.

आषाढी एकादशी ६ जुलै रोजी असून विविध भागांतून पायी दिंड्या पंढरपूरसाठी मार्गस्थ झाल्या आहेत. या महिन्याच्या वारीमध्ये नांदेड जिल्ह्यातील हजारो वारकरी सहभागी होतात. नांदेडच्या विठ्ठल भक्तांकडून आरोग्य सेवा, अन्नदान आदी सेवा दिल्या जातात. दरम्यान, सायकलिस्ट ग्रुपच्या माध्यमातून १४ जण गुरुवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. विशेष म्हणजे यामध्ये चार तरुणींचा समावेश आहे. रॅली मार्गस्थ झाली त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले, जि.प.चे लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, कवी बापू दासरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वारीचा मार्ग नांदेड ते लातूर, धाराशिव मार्गे पंढरपूर असा असणार आहे. वारीचे अंतिम स्वरूप २२ जून रोजी पंढरपूर नगरीत विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाने पूर्णत्वास जाईल. सकाळी ६:३० वाजता सामूहिक अभिषेक, आरती आणि दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे आहेत सहभागी सायकलिस्टया रॅलीमध्ये नांदेड येथील सायकलपटू डॉ. देवेंद्र पालीवाल, डॉ. गणेश पावडे, गजेंद्र दरक, चेतन परमाणी, रोमीत मालवाणी, डॉ. मनीष दागडिया, अर्पित फलोर, डॉ. भावना भगत, सुकेशनी शिंदे, डॉ. ओम दमकोंडवार, युगा दासरी, सुधा टेकुळे, अभिजित ठारके यांचा समावेश आहे.

एक नवा विचार, एक नवा प्रवासभक्ती, आरोग्य आणि पर्यावरण या तिन्ही अंगांनी समृद्ध अशा या उपक्रमातून ‘वारी’चा नव्याने अर्थ लावण्याचा प्रयत्न सदर सायकलपटू करत आहेत. या सायकलवारीमागे ‘पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा आणि परंपरेला नवा अर्थ द्या’ असा प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला जात असल्याचे सायकलपटू डॉ. गणेश पावडे यांनी सांगितले.

असा होणार सायकलवारीचा प्रवास१९ जून रोजी नांदेड येथून निघालेली सायकलवारी १३६ किमीचा पल्ला पूर्ण करून लातूर येथे मुक्कामी असेल. पुढे लातूर ते धाराशिव १११ किमी आणि २१ जून रोजी धाराशिव ते पंढरपूर असा ९० किमीचा वारीचा शेवटचा टप्पा असेल. या तिन्ही टप्प्यांत प्रवासादरम्यान स्थानिक ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत, सहकार्य आणि भोजन व्यवस्था होणार असून, सहभागी भाविकांची आरोग्य तपासणी आणि प्राथमिक उपचाराची व्यवस्था केल्याचे डॉ. सुकेशनी शिंदे यांनी सांगितले.

सायकल चालवणे एक जीवनपद्धतीसमाजात वाढणारे प्रदूषण, आरोग्याविषयी अनास्था आणि गतिमान जीवनशैलीतील ताण याला उत्तर देत, सायकल हे केवळ वाहन नसून, एक जीवनपद्धती म्हणून मांडण्याचा हा प्रयत्न आहे. श्रद्धा आणि सायकल या दोघांची सांगड घालत नांदेड येथून पंढरपूरपर्यंत तब्बल ३२१ किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करण्यात येणार आहे. - अर्पित फुलोर

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५NandedनांदेडCyclingसायकलिंग