शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंधराशे लोकसंख्येच्या सावळेश्वरमध्ये १५ हजारांवर जन्म-मृत्यू नोंदी; CRS घोटाळ्याने नांदेडमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:59 IST

परराज्यातील नागरिकांच्या नोंदींचा संशय; नांदेडच्या सावळेश्वरमध्ये मोठा 'डिजिटल घोटाळा' उघड

 

- गोविंद शिंदेबारूळ (जि.नांदेड) : कंधार तालुक्यातील सावळेश्वर या गावाची सन २०११ जनगणनेनुसार लोकसंख्या सुमारे १५०० असताना, सन २०२५ मध्ये ‘ॲड ओल्ड इव्हेंट’ (विलंबित जन्म-मृत्यू नोंदी) अंतर्गत तब्बल १५ हजार ५७० नोंदी झाल्याचे समोर आले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या मोठी असल्याने ‘सीआरएस’ प्रणालीतील नोंदी संशयाच्या भोवऱ्यात आढळल्या आहेत. यासंदर्भाने तालुकास्तरावर चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पुणे येथील जन्म-मृत्यू निबंधक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या नोंदी केंद्रीय नागरी नोंदणी प्रणाली (सीआरएस) पोर्टलवर केल्या आहेत. एका ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर नोंदी कशा झाल्या, याबाब माहिती संकलन सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार या नोंदींमध्ये झारखंड, उत्तराखंड तसेच उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील नागरिकांच्या नोंदी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही.

नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात जन्म-मृत्यू नोंदी करून दिल्या जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सावळेश्वरमधील नोंदींचीही सखोल तपासणी करण्यात येत आहे. याच प्रकारचे संशयास्पद नोंदीचे प्रकरण यवतमाळ जिल्ह्यातील सेंदूर, सनी, भवानी तसेच जळगाव जिल्ह्यातील रताळे येथे समोर आले असल्याने, या सर्व प्रकरणांचा परस्पर संबंध आहे का, याचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कंधारचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

काय म्हणतात, गावचे ग्रामसेवकग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोकसंख्या १ हजार ६६६ आहे. सीआरएस प्रणालीवर सध्या १५ हजार ५७० लोकसंख्या दिसत आहे. त्यातील नोंदीपैकी माझ्याकडून केवळ एकाच व्यक्तीची जन्मनोंद करण्यात आली असून, तिही तहसीलदारांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. उर्वरित नोंदीबाबत संशय असून, त्यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दिली जात आहे. चौकशी सुरू आहे.- भावना कावळे, ग्रामसेविका, सावळेश्वर

तपास यंत्रणांचा प्राथमिक अंदाजप्राथमिक तपासात सीआरएस व ई-ग्राम स्वराज्य प्रणालीवरील यूजर आयडी व पासवर्डचा गैरवापर झाल्याची शक्यता तपास यंत्रणा तपासत आहे. नेमक्या कोणत्या कालावधीत व कोणाच्या लॉगिनद्वारे या नोंदी करण्यात आल्या, याचा तांत्रिक तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded village sees birth-death record surge; CRS fraud suspected.

Web Summary : Sawaleshwar, with 1500 residents, recorded over 15,000 birth-death entries, raising CRS fraud suspicions. Authorities investigate potential misuse of IDs, linking entries to other states. BJP leader Kirit Somaiya demands inquiry.
टॅग्स :NandedनांदेडRevenue Departmentमहसूल विभाग