शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

दीड हजारांवर शेतकऱ्यांना मिळाली सौर कृषीपंप जोडणी, ६८७ शेतकरी प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 17:27 IST

सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा केला जात नसल्याने बहुतांश शेतकरी पर्यायी मार्ग म्हणून सौर वीजपंपाचा वापर करीत आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना  महिनाभरापासून मिळाली कामाला गती

नांदेड : जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जवळपास २२०० शेतकऱ्यांनी कोटेशन भरले असून त्यापैकी १५१३ शेतकऱ्यांना कृषीपंपांची जोडणी दिली आहे. तर उर्वरित ६८७ शेतकऱ्यांच्या सौर कृषीपंप जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा केला जात नसल्याने बहुतांश शेतकरी पर्यायी मार्ग म्हणून सौर वीजपंपाचा वापर करीत आहेत. त्यात सबसिडी मिळणारे सौरपंप मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून  मिळविण्यासाठी ६ हजार ९४९ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३ हजार ५२ अर्ज रद्द झाले.  छाननीत वैध झालेल्या अर्जदारांपैकी २२०० शेतकऱ्यांनी कोटेशन भरले आहेत. त्यात २१५७ शेतकऱ्यांनी वेंडरची निवड केली आहे. दरम्यान, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सौरपंप उभारणीसाठी लागणारे साहित्य शेतात निर्धारित वेळेत पोहोचू शकले नव्हते. परंतु, मागील महिनाभरापासून सदर कामास गती मिळाली आहे. 

निवडलेल्या कंपन्यांना किती उद्दिष्ट?जिल्ह्यात १३ कंपन्यांपैकी सर्वाधिक ६८० लक्ष असलेल्या टाटा पॉवर सोलार कंपनीने ५६३ पंप बसविलेले आहेत. त्यानंतर सीआरआय पंप- २८८ पैकी २५९ पंप बसविले, रवींद्र एनर्जी - ८४ पैकी ३९, मुद्रा सोलार - ७७ पैकी १३, जैन एरिगेशन ४४ पैकी ४३, एल ॲण्ड टी- १९३ पैकी १०९, स्पॅन - ३९१ पैकी ३००, शक्ती - १६४ पैकी ९३, रोटोमॅग- ३५ पैकी ००, नोवास ग्रीन - १२७ पैकी ५०, क्लरो - २१ पैकी १९, रॉमेट- १८ पैकी ००, जीके एनर्जी ३१ पैकी २५ सोलार पंप.

कोरोनामुळे टाळेबंदी आणि नंतर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सौर पंपासाठी लागणारे साहित्य शेतात पोहोचविण्यासाठी अडचणी येत होत्या. परंतु, आता सदर कामास गती मिळाली नाही. लवकरात लवकर सोलार पंप शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न महावितरण करत आहे.   -संतोष वहाणे, अधीक्षक अभियंता, नांदेड

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती