शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कचरा वजनाच्या फेरतपासणीचे आयुक्तांनी दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:52 IST

शहरातील कचरा उचलताना दगड, माती कचरा वाहनात टाकून त्यांचे वजन केले जात असल्याचा प्रकार विरोधी पक्ष नेत्या गुरप्रित सोडी यांनी उघडकीस आणल्यानंतर आता तुप्पा येथील डंपिंग ग्राऊंडवरील वजनाची अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेरतपासणी करण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देविभाग प्रमुख करणार तुप्पा डंपिंग ग्राऊंडवर तपासणी

नांदेड : शहरातील कचरा उचलताना दगड, माती कचरा वाहनात टाकून त्यांचे वजन केले जात असल्याचा प्रकार विरोधी पक्ष नेत्या गुरप्रित सोडी यांनी उघडकीस आणल्यानंतर आता तुप्पा येथील डंपिंग ग्राऊंडवरील वजनाची अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेरतपासणी करण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी दिले आहेत.शहरातील कचरा उचलण्याचे काम आर अ‍ॅन्ड डी या ठेकेदारास देण्यात आले आहे. या ठेकेदाराकडून कचरा वाहनामध्ये चक्क दगड, माती टाकून त्याचे वजन केले जात असल्याचा प्रकार विरोधी पक्ष नेत्यांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणानंतर तुप्पा डंपिंग ग्राऊंडच्या ठिकाणी ठेकेदाराकडून उचलण्यात आलेल्या कच-यामध्ये माती, दगड, विटा तसेच बिल्डींग मटेरियल आढळून येणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी कच-याची फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.महापालिकेच्या विभाग प्रमुखांना एक दिवस तुप्पा डंपिंग ग्राऊंडवर भेट देवून कच-याची फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या आदेशानंतर एकाही अधिका-यांनी तुप्पा डंपिंग ग्राऊंडवर भेट दिली नाही. अथवा कच-याच्या वजनाची फेरतपासणी केली नाही. हा प्रकार गंभीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.विभाग प्रमुखांनी तुप्पा डंपिंग ग्राऊंडवर कंत्राटदाराकडून उचलण्यात आलेल्या घनकच-याचे संपूर्ण निरीक्षणासह तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल द्यावा, असे आदेश दिले आहेत.एकूणच शहरातील कचºयाच्या वजनेप्रकरणात होत असलेली हेराफेरी आयुक्ताने गांभीर्याने घेतली आहे. आता आयुक्तांनी नियुक्त केलेल्या विभाग प्रमुखांचे वजनाबाबतचे फेर तपासणी अहवाल काय येतात व त्यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :NandedनांदेडGarbage Disposal Issueकचरा प्रश्नNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका