शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान टाळण्यासाठी शेतमाल तारण योजना सुरू करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 19:10 IST

जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरु करण्याचे आदेश सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी बाजार समित्यांना दिले आहेत.

नांदेड : सध्या शेतमालाच्या कोसळलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून हे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरु करण्याचे आदेश सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी बाजार समित्यांना दिले आहेत.

जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांच्या सचिवांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतमाल तारण योजनेबाबत आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टिकोणातून कृषी पणन मंडळ  १९९०-९१ पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे. या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, चणा, भात, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), काजू बी, बेदाना, सुपारी व हळद या शेतमालांचा समावेश करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या चालू बाजार भावानुसार होणाऱ्या किमतीच्या  ७५ टक्केपर्यंत रक्कम सहा महिने (१८० दिवस) कालावधीसाठी सहा टक्के व्याजदराने तारण कर्ज देण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्य अथवा केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदाम पावतीवरही शेतकऱ्यांना तारण कर्ज उपलब्ध  करुन देण्यात येते. सदर योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जाते. बाजार समितीकडे स्वत:चे गोदाम नसल्यास खाजगी गोदाम भाड्याने घेऊन सदर योजना राबवू शकते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेतमालाचा चालू वर्षाचा सातबारा उतारा, पीकपेरा, आधारकार्ड झेरॉक्स, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आदी कागदपत्रे बाजार समितीस द्यावी लागणार आहेत. शेतमाल तारण योजना ही शेतकऱ्यांसाठी  फायदेशीर आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने ही योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी  बाजार समित्यांनी व्यापक प्रमाणात या योजनेबद्दल शेतकऱ्यांत जनजागृती करावी. विविध माध्यमातून त्याची प्रचार, प्रसिद्धी करावी,अशी सूचना जिल्हा उपनिबंधक फडणीस यांनी केले  आहे.

गतवर्षी २ कोटी ३५ लाखांचे तारण कर्जगतवर्षी कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबादकडून शेतमाल तारण योजना यशस्वीपणे राबवून धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना २ कोटी ३५ लाख शेतमाल तारण कर्ज देण्यात आले. सुगीचा हंगाम सुरु  होण्याच्या काळात शेतमालाच्या दरात असणाऱ्या मंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतमाल तारण योजनेत सहभागी करुन घ्यावे, असेही बाजार समित्यांना सांगण्यात आले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमाNandedनांदेड