शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

अवैध उपसा रोखण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 01:34 IST

जिल्ह्यातील बहुतांश भागात निर्माण झालेली पाणीटंचाई आणि सरासरीपेक्षा झालेले कमी पर्जन्यमान लक्षात घेता जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघू तलावांतील होणारा अनधिकृत पाणीउपसा तत्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले असून पाणीउपसा रोखण्यासाठी तालुकास्तरावर उपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त पथकही स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डोंगरे यांनी दिले आहे.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथक

अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील बहुतांश भागात निर्माण झालेली पाणीटंचाई आणि सरासरीपेक्षा झालेले कमी पर्जन्यमान लक्षात घेता जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघू तलावांतील होणारा अनधिकृत पाणीउपसा तत्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले असून पाणीउपसा रोखण्यासाठी तालुकास्तरावर उपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त पथकही स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डोंगरे यांनी दिले आहे.जिल्ह्यात यंदा ८१ टक्के पाऊस झाला आहे. परतीचा पाऊस न झाल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातही मुखेड, देगलूर, उमरी, नायगाव, कंधार, लोहा, धर्माबाद या तालुक्यांत पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याचे शासनाने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. या तालुक्यांत दुष्काळ घोषित होण्याची अपेक्षा आहे, त्याचवेळी इतर तालुक्यांतही पाण्याचा प्रश्न गंभीरच आहे. त्यामुळे आगामी काळात निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यातील विष्णूपुरी, मानारसह नऊ मध्यम प्रकल्प, ८१ लघू प्रकल्प, लघू तलाव, नदी, नाले, विहिरी आदी जलसाठ्यातून अनधिकृत पाण्याचा उपसा थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डोंगरे यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे अनधिकृतपणे पाणीउपसा करण्यासाठी वापरण्यात येणाºया विद्युत मोटारी जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.जिल्ह्यात जलसाठ्यातून अनधिकृत उपसा होऊ नये व आरक्षित पाणीसाठा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त पथक स्थापन करण्यात येणार आहे. या पथकात प्रत्येक तालुक्यासाठी तहसीलदार सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. तर गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता, तालुका कृषी अधिकारी आणि स्थानिक पोलीस निरीक्षक हे या पथकात सदस्य म्हणून राहणार आहेत.सदर पथकाने ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी विहिरी अथवा अन्य जलाशयातून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे. खाजगी जलसाठेही अधिग्रहित करण्यात यावे. तसेच महाराष्टÑ भूजल अधिनियम २००९ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले आहेत.उपविभागीय अधिका-यांनी दर १५ दिवसाला संयुक्त पथकाची बैठक घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या पथकाने अनधिकृत उपसा थांबविणे व जलसाठे संरक्षित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त पथकास मदत करण्यासाठी समितीअंतर्गत येणा-या प्रत्येक तालुक्यासाठी प्रकल्पस्तरीय समिती अर्थात फिरते पथक स्थापन करायचे आहेत. या फिरत्या पथकामध्ये संबंधित प्रकल्पाचे शाखा अभियंता, कालवा निरीक्षक किंवा बीट प्रमुख, चौकीदार, मोजणीदार, महावितरणचे शाखा अभियंता, स्थानिक पोलीस उपनिरीक्षक, नगरपालिका हद्दीत शाखा अभियंता किंवा एक कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचा फिरत्या पथकात समावेश राहील. पाणीचोरी रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकांसाठी जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी म्हणून पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता काम पाहणार आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागातील जनता व लोकप्रतिनिधीकडून प्राप्त होणाºया तक्रारीसंदर्भात स्थळपाहणी करुन तातडीने तक्रारीचे निरसन करावे, असे आदेशही डोंगरे यांनी दिले आहेत.सिंचनास विद्युतजोडणीची परवानगी नाहीज्या प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. अशा परिसरातील कोणत्याही शेतक-यास सिंचनासाठी विद्युत जोडणीस परवानगी देऊ नये असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. पाटबंधारे जलाशयातील अवैध पाणी उपसा होऊ नये, वीज चोरी होऊ नये, तसेच टंचाईसदृश्य परिस्थितीत उपाययोजना करण्याची कारवाई करावी. अनधिकृत उपसा होत असलेल्या जलस्त्रोताचे विद्युत पुरवठा बंद करावा आणि पाणीउपसा करणाºयावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले़

टॅग्स :NandedनांदेडsandवाळूCrime Newsगुन्हेगारी