शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

नांदेडात एटीएसच्या कारवाईत साडेसात लाखांचा अफू जप्त; राजस्थानमधील युवक-युवती ताब्यात

By श्रीनिवास भोसले | Updated: December 21, 2023 18:51 IST

कोणत्या न कोणत्या कारवाईमुळे नांदेड नेहमीच राज्यातच नव्हे तर देशाच चर्चेत राहते.

नांदेड: दहशतवाद विरोधी पथकाने गुरूवारी दुपारी नांदेड रेल्वेस्थानकासमोर धाड टाकून जवळपास साडेसात लाख रूपयांचा अफू जप्त केला. एका युवकासह तरूणीला ताब्यात घेतले असून त्यांना उद्या शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या कारवाईमुळे नांदेडात नशेसाठी वापरले जाणारे आम्लीपदार्थ परराज्यातून येत असल्याचे पुन्हा उघड झाले आहे.

कोणत्या न कोणत्या कारवाईमुळे नांदेड नेहमीच राज्यातच नव्हे तर देशाच चर्चेत राहते. दरम्यान, मागील काही दिवसांपासून गांजासह इतर अंमली पदार्थाची नांदेडात विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यातही परराज्यातून येणारा अफू, गांजा रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. राजस्थानातील दोघे जण नांदेडात अफू घेवून आल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. त्यानूसार गुरूवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथकाने वजिराबाद ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने एटीएसचे पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकण्यात आली.

नांदेड रेल्वेस्थानकातून बाहेर पडणाऱ्या एका युवकासह तरूणीला ताब्यात घेतले. यामध्ये युवकाचे नाव सुरेशकुमार किशनाराम बिष्णोई (वय २९)रा.अरणीयाली.ता. रानेवाडा जि.जालोर तर युवतीचे नाव अमरी नारायण अड (वय २६) रा.बस्सी ता.कुशलगड जि.बासवाडा असे आहे. दोघेही राजस्थानमधील आहेत. त्यांच्याकडून जवळपास ७ लाख ३२ हजार रूपये किंमतीचा ३ किलो ६६० ग्रॅम अफू न आंमली पदार्थ अफू/अफीम जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरे यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई एटीएसचे पोलिस निरीक्षक सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब थोरे, अनिता चव्हाण, वजिराबादचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू मुत्तेपोड, पोलीस उपनिरीक्षक अगबर पठाण, हेकॉ शेख चांद, संभाजी चाटे, मारोती कोटगीर, जयराम यळदगावे, दिनेश पांडे, वैजनाथ अनंतवार, बालाजी सोनटक्के, मोहम्मद अलीम, श्याम राऊत, गव्हाणकर, बसंत रामगडीया यांच्या पथकाने केली.

पोलिसांना गुंगारा देण्याचा डाव...राजस्थानातून आणलेला अफू पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून आरोपींनी डाव रचला होता. परंतु, पोलिसांनी तो हाणून पाडला. महिला आरोपी असलेल्या अमरीकडे ३ किलो आणि पुरूरष आरोपीने स्वतकडे केवळ ६६० ग्रॅम अफू ठेवला. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर त्यांनी एवढचा अफू असल्याचे सांगितले. परंतु, संशयितरित्या पळ काढण्याचा प्रयत्नात असलेल्या अमरीला पोलिसांनी पकडून चौकशी केली असता तिच्याकडे तब्बल तीन किलो अफू आढळला.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी