शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु; मदतीसाठी पंचायत समितीत हेल्पलाईन सेंटर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:26 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत ७ एप्रिल पासून आॅनलाईन फॉर्म भरण्यात येत आहेत. संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये हे फॉर्म भरले जात आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत ७ एप्रिल पासून आॅनलाईन फॉर्म भरण्यात येत आहेत. बदल्यासाठी फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पंचायत समिती स्तरावर हेल्पलाईन सेंटर सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

नांदेड : जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदली प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. ही बदली प्रक्रिया आॅनलाईन होणार असून शिक्षकांना जिल्ह्यांतर्गत बदल्यासाठी फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पंचायत समिती स्तरावर हेल्पलाईन सेंटर सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या हेल्पलाईन सेंटरवर जिल्ह्यातील संगणक  विभागातील समन्वयकाची नियुक्ती करण्याची सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत ७ एप्रिल पासून आॅनलाईन फॉर्म भरण्यात येत आहेत. संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये हे फॉर्म भरले जात आहेत. यामध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात शिक्षकांनी राज्य समन्वयकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचवेळी ९ एप्रिल रोजी अव्वर सचिवांनी काढलेल्या आदेशात ज्या शिक्षकांना इंटरनेटच्या तांत्रिक ज्ञानाअभावी बदली संदर्भातील आॅनलाईन अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. अशा शिक्षकांना पंचायत समिती कार्यालयात हेल्पलाईन केंद्र उघडून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  या हेल्पलाईन सेंटरवर जिल्ह्यातील संगणक प्रोग्रामर, एमआयएस समन्वयक यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. या हेल्पलाईन सेंटरवर शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, असे अपेक्षित आहेत. त्याचवेळी या सुविधा उपलब्ध करुन दिल्याची माहिती   शिक्षकांना द्यावी, असेही  सुचित करण्यात आले आहेत.

बदलीसंदर्भात शिक्षकांना सूचनाच नाहीत !जिल्हास्तरीय बदल्या संदर्भात शिक्षकांना थेट राज्यस्तरावरुन सूचना प्राप्त होत आहेत. पण प्रत्यक्षात स्थानिक स्तरावरुन अद्याप कोणतीही नोटीस अथवा माहिती शिक्षकांना दिली नाही.  शिक्षणाधिकारी कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावरुन कोणतेही पत्र शिक्षकांना अद्याप दिले नाही. राज्यस्तरावरुन प्राप्त झालेल्या माहितीवरुन शिक्षक बदलीसाठी आॅनलाईन अर्ज भरत आहेत. हे अर्ज भरतानाही अडचणी येत आहेत. अर्ज भरल्यानंतर व्हेरिफिकेशन होत नाही.  जिल्हा परिषदेने आजपर्यंत अवघड व सर्वसाधारण क्षेत्र असलेल्या गावांची यादी घोषित केली नसल्याने गतवर्षीची यादीच अंतिम समजली जाणार आहे काय? याबाबतही संदिग्धता निर्माण झाली आहे. महिलांना काम करण्यासाठी अवघड गावांची यादी अद्याप जाहीर करण्यात आली नाही. संवर्ग १ ची बदली प्रक्रिया राबवून संवर्ग २ ची बदली प्रक्रिया राबवायची आहे. त्यामुळे वेळ किती जाईल, हेही अनिश्चित आहे. स्थानिक पातळीवरुन बदलीबाबतचे आदेश निघणार का नाही, याकडेही लक्ष लागले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकNanded zpनांदेड जिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाTransferबदली