शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

एक झाड माझे अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 01:18 IST

वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी वृक्षलागवड महत्त्वाची असून त्यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत़ अशाचप्रकारे नांदेडच्या काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पुढाकार घेत १ हजार वृक्ष लागवड करून ती जोपासण्याचा संकल्प केला आहे़ या अभियानाचा प्रारंभ पर्यावरणदिनी नांदेड येथील केमिस्ट भवन परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला़

ठळक मुद्देएक हजार वृक्ष लावणार संवर्धनासाठी करणार दहा लाख रूपये खर्च

नांदेड : वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी वृक्षलागवड महत्त्वाची असून त्यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत़ अशाचप्रकारे नांदेडच्या काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पुढाकार घेत १ हजार वृक्ष लागवड करून ती जोपासण्याचा संकल्प केला आहे़ या अभियानाचा प्रारंभ पर्यावरणदिनी नांदेड येथील केमिस्ट भवन परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला़पर्यावरणप्रेमी नागरिकांनी एकत्र येत ३० मे रोजी पहिली बैठक घेवून एक हजार वृक्षलागवड करून संगोपन, संवर्धन करण्याचा निर्धार केला़ यावेळी आनंदवन मित्र परिवार, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, साईप्रसाद यासह विविध सेवाभावी संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती़ दरम्यान, सदर अभियानास एक झाड माझे अभियान मित्र परिवार असे नाव देण्यात आले असून त्याअंतर्गत सेवाभावी वृत्तीने काम सुरू करण्यात आले आहे़पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बुधवारी या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली़ यावेळी स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़उद्धव भोसले, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, आयुक्त लहुराज माळी, मुख्य वनसंरक्षक अधिकारी श्रीकांत ठाकरे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती़ या अभियानात आजपर्यंत दोनशेहून अधिक जणांनी सहभाग नोंदविला आहे़केमिस्ट भवन येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी वृक्षसंवर्धनासाठी सखोल मार्गदर्शन करून उपक्रमाचे कौतुक केले़ यावेळी प्रजापिता ब्रम्हकुमारी शिवकन्या बहेनजी, दीपक कोठारी, अशोक गंजेवार, लक्ष्मण क्षीरसागर, संजय बजाज, विठ्ठल पावडे, अमित काबरा, शमेंद्र हुंडीवाला, डॉ़अतुल काबरा, डॉ़ दळवी, प्रा़ढगे आदींची उपस्थिती होती़ या उपक्रमाचा खर्च पर्यावरण प्रेमी नागरिक करीत आहेत़भारतीय मातीतील वृक्षांची होणार लागवडवृक्षारोपण करताना भारतीय मातीतील आणि आपल्या संस्कृतीतील झाडांची निवड केली जाणार आहे़ जेणेकरून भविष्यात त्यावर पक्ष्यांचा चिवचिवाट पहायला मिळाला पाहिजे़ यामध्ये चिंच, लिंब, जांभूळ, पिंपळ, वड, आवळा आदी प्रकारची झाडेला वण्यात येणार आहेत़सहा ते दहा फूट उंच असणाऱ्या वृक्षांची लागवड केली जाणार असून त्याचे वर्षभर संगोपन केले जाणार आहे़ आॅक्टोबरपर्यंत झाडे पावसाच्या पाण्यावर जगतात़ तेथून पुढे नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत वृक्षाला पाणी घालणे, फवारणी करणे, खत घालण्यापर्यंतचे नियोजन आहे़

टॅग्स :Nandedनांदेडenvironmentवातावरणforestजंगल