शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एकजण जागीच ठार; दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 17:50 IST

One killed on the spot in Accident at Bhokar : भोकर तालुक्यातील बटाळा ते दिवशी रस्त्यावरील कोळगाव शिवारात झाला अपघात

भोकर ( नांदेड ) : दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ( दि. २१) सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील बटाळा ते दिवशी रस्त्यावरील कोळगाव शिवारात घडली आहे. संभाजी अशोक ढगे  असे मृताचे नाव आहे. 

उमरी तालुक्यातील ईज्जतगाव संभाजी अशोक ढगे ( २८) हा मंगळवारी ( दि. २० ) बिलोली तालुक्यातील कांगठी या सासरवाडीला गेला होता. आज सकाळी भोकर तालुक्यातील नांदा येथे राहणाऱ्या मेव्हणीला सणानिमित्त आणण्यासाठी संभाजी आणि त्याचा मेव्हूणा शंकर हनमंत नरवाडे (१६,  रा. कांगठी ) दुचाकीवरुन गेले. दरम्यान, भोकर तालुक्यातील बटाळा ते दिवशी रस्त्यावरील कोळगाव शिवारात समोरुन येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली.

या जोरदार धडकेत संभाजी अशोक ढगे याच्या डोक्याला जबर मार लागून जागीच मृत्यू झाला. तर मेव्हूणा शकंर नरवाडे व दुसऱ्या दुचाकीवरील गजानन यलप्पा कुंटावाड ( ३०,रा. नांदा ता. भोकर ) हे दोघे गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडला रवाना करण्यात आले आहे. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNandedनांदेड