शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वानराने मोटरसायकलवर उडी मारल्याने एक ठार; मागे बसलेला हेल्मेेटमुळे बचावला

By श्रीनिवास भोसले | Updated: May 3, 2023 14:27 IST

पुलावर बसलेल्या वानराने अचानक मोटारसायकलवर उडी मारली. यामुळे दुचाकीवरील दोघेही खाली पडले.

धर्माबाद : मोटरसायकलवरून वेगाने दोघे जात असताना पुलावर बसलेल्या वानराने अचानक मोटरसायकलवर उडी मारली. यात दोघेही खाली पडल्याने मोटरसायकलचालक जागीच ठार झाला, तर मागे बसलेला एक जण हेल्मेट असल्याने बचावला. मात्र तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना तालुक्यातील राजापूर पाटीजवळ सोमवारी (दि. १)घडली.

धर्माबाद शहरातील २६ वर्षीय अभिषेक होमबहादुर तमु (रा. केशवनगर ,किशनगड अजमेर, ह.मु. धर्माबाद) व ३० वर्षीय कृष्णा बाबुशा शेळके (रा. शांतीनगर धर्माबाद) हे दोघे जण खासगी कामानिमित्त धर्माबादहून राजापूर मार्ग नांदेडला मोटरसायकलने जात होते. राजापूर पाटीजवळील पुलावर बसलेल्या वानराने अचानक त्यांच्या मोटारसायकलवर उडी मारली. यामुळे यात दोघेही जबर खाली पडले. चालक अभिषेक होमबहादूर तमू यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाला, तर मागे बसलेला कृष्णा बाबुशा शेळके यांने डोक्याला हेल्मेट लावले होते म्हणून डोक्याला मार न लागता छातीला पायाला मार लागला. तो गंभीर जखमी झाला आहे. कृष्णा शेळके याला निझामाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

आई-वडिलांचा आधार गेलाअभिषेक तमु याने धर्माबादेत गेल्या वर्षीपासून फरशीचे दुकान सुरू केले होते. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अभिषेक हा अविवाहित असून आई-वडिलांचा आधार देणारा तरुण मुलगा गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सायलु मकलवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक आडे करीत आहेत.

 

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीNandedनांदेड