नांदेडच्या पाेलीस महानिरीक्षक कार्यालयात काेराेना ब्लास्ट, डीआयजीसह अनेक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 02:36 PM2022-01-11T14:36:29+5:302022-01-11T14:36:47+5:30

डीआयजी, रीडरसह अनेक पाॅझिटिव्ह आले असून आणखी तपासण्या सुरूच आहेत

A number of corona positives including DIG in the office of Inspector General of Police in Nanded | नांदेडच्या पाेलीस महानिरीक्षक कार्यालयात काेराेना ब्लास्ट, डीआयजीसह अनेक पॉझिटिव्ह

नांदेडच्या पाेलीस महानिरीक्षक कार्यालयात काेराेना ब्लास्ट, डीआयजीसह अनेक पॉझिटिव्ह

Next

नांदेड : नांदेड येथील परिक्षेत्रीय विशेष पाेलीस महानिरीक्षक कार्यालयात काेराेनाचा उद्रेक झाला आहे. खुद्द पाेलीस उपमहानिरीक्षक निसार तांबाेळी, त्यांचे रीडर सहाय्यक पाेलीस निरीक्षक प्रवीण राठाेड यांच्यासह अनेकांना काेराेनाची लागण झाल्याने या कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले आहे.

नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काेराेना रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. ३ जानेवारीला केवळ १० रुग्णसंख्या हाेती. मात्र त्यानंतर पाच दिवसांत हा आकडा १४ पटीने वाढला. ९ जानेवारीला १४७ एवढी काेराेना बाधितांची संख्या नाेंदविली गेली. दरदिवशी त्यात वाढ हाेत आहे. काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची अंमलबजावणी करणाऱ्या पाेलिसांमध्येही काेराेनाचा शिरकाव झाला आहे. जिल्हा पाेलीस दलात काही कर्मचाऱ्यांना याची लागण झाली. नांदेडच्या विशेष पाेलीस महानिरीक्षक कार्यालयात तर जणू काेराेना ब्लास्ट झाला आहे. या कार्यालयातील बहुतांश अधिकारी, कर्मचारी बाधित असल्याचे सांगितले जाते. आणखी नमुने घेणे सुरू आहेत. त्यामुळे आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्वत: उपमहानिरीक्षक निसार तांबाेळी, त्यांचे रीडर व इतर काहींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. अधिकारी, कर्मचारी बाधित झाल्याने महानिरीक्षक कार्यालयाचे दैनंदिन प्रमुख काम जणू ठप्प झाले आहे.

१० महिन्यांत १५६१ पाेलिसांना घेरले
नांदेड परिक्षेत्रातील चार जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत (२२ मार्च २०२१ ते १० जानेवारी २०२२) काेराेनाने तब्बल १ हजार ५६१ पाेलिसांना घेरले आहे. त्यामध्ये २२४ पाेलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यातही बाधितांची सर्वाधिक संख्या ही नांदेड जिल्ह्यात आहे. गेल्या १० महिन्यांत काेराेनाने २३ पाेलीस अंमलदारांचा मृत्यू झाला आहे. त्यातील सर्वाधिक नऊ हे नांदेड जिल्ह्यातील आहेत. परभणी सात, हिंगाेली तीन तर लातूर जिल्ह्यातील चार जणांचा समावेश आहे. आजच्याघडीला महानिरीक्षक कार्यालयातील केवळ दाेन अधिकारी व एक अंमलदार बाधित असल्याची नाेंद आहे. परंतु प्रत्यक्षात बहुतेेकजण आजारी असून त्यांचे अहवाल पाॅझिटिव्ह येण्याची भीती पाेलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

१० महिन्यांतील जिल्हानिहाय बाधित
जिल्हा             अधिकारी अंमलदार
नांदेड             ८७             ४६८
परभणी             ६६             ३७४
हिंगाेली            १३             ९६
लातूर             ५६             ३९९
एकूण             २२४             १३३७

Web Title: A number of corona positives including DIG in the office of Inspector General of Police in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.