शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या १२ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 22:46 IST

मंगळवारी ३४५ बाधित आढळले; तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला

ठळक मुद्देसध्या ३ हजार ८८९ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३२१ जणांचा मृत्यू झाला आहे एकूण ७ हजार ९०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे

नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी नव्या ३४५ बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १२ हजार १८२ वर पोंहचली आहे. मागील २४ तासात आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्याही ३२१ एवढी झाली आहे. 

मंगळवारी १४८५ अहवालापैकी ३४५ अहवाल पॉझिटिव्ह आले. यात स्वॅब तपासणीद्वारे ५८ जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये नांदेड मनपा क्षेत्रातील २९, अर्धापूर १, किनवट २, बिलोली ३, हिंगोली ७, नांदेड ग्रामीण ३, हिमायतनगर ४, मुखेड ५ तर परभणी जिल्ह्यातील चौघे बाधित आढळून आले. अ‍ॅन्टीजेन टेस्टद्वारे तब्बल २८७ जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये नांदेड मनपा क्षेत्रातील ९४ जणांचा समावेश आहे. हदगाव येथे १४ तर अर्धापूर येथे १५ रुग्ण बाधित आढळले. किनवट ११, बिलोली ९, मुखेड २३, धर्माबाद ५, उमरी ९, हिमायतनगर २, नांदेड ग्रामीण ६, मुदखेड ३, लोहा ४०, कंधार ३५, भोकर ४, देगलूर २, नायगाव ७ तर हिंगोली आणि अदिलाबाद येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १२ हजार १८२ एवढी झाली आहे. 

मंगळवारी आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्याही ३२१ वर गेली आहे. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या हडको येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील ६४ वर्षीय पुरुषाचाही याच ठिकाणी उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नांदेड शहरातील गवळीपुरा येथील ८० वर्षीय पुरुषाचाही मंगळवारी कोरोनाने बळी घेतला.२१३ जणांची कोरोनावर मातमंगळवारी आणखी २१३ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. त्यामुळे आजवर कोरोनावर मात करणाºयांची संख्या ७ हजार ९०९ एवढी झाली आहे. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी येथील २५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर एनआरआय, पंजाबभवन आणि होम आयसोलेशन असलेल्यांपैकी ४४ रुग्णही कोरोनामुक्त झाले. जिल्हा रुग्णालयातील ८, किनवट १, लोहा ५, धर्माबाद १४, माहूर १९, मुखेड २८,  हदगाव २०, कंधार ४, मुदखेड ३, नायगाव १७, लातूर येथे संदर्भित केलेला एक रुग्ण आणि खाजगी रुग्णालयातील २४ जणांनी मंगळवारी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६७.०३ टक्के असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.५१ जणांची प्रकृती गंभीरजिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १२ हजार १८२ असली तरी यातील ३२१ जणांचा मृत्यू झाला असून ७ हजार ९०९ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याने त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये ३ हजार ८८९ जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये विष्णूपुरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २९८, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम आयसोलेशन असे एकत्रित १८३६ तर जिल्हा रुग्णालय कोविड सेंटरमध्ये ८४ आणि जिल्हा रुग्णालयातील नव्या इमारतीत २४ जण उपचार घेत आहेत.  उपचार सुरू असलेल्या या रुग्णांपैकी ५१ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. 

टॅग्स :Nandedनांदेडcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस