लॉकडाऊनचा काळ संपल्यावर तालुक्याच्या व इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराला सुरुवात झाली होती; पण कोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बंदच होत्या. यामुळे परिसरातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांना अडचण येत होती. याबाबत ‘लोकमत’मध्ये काही दिवसांपूर्वी सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत आता दर मंगळवारी कोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर होत असल्याची माहिती आरोग्य कर्मचारी मनोज साळवे यांनी दिली. आतापर्यंत दोन शिबिर झाले असून, या दोन शिबिरांत २८ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे त्यांनी सांगितले. शस्त्रक्रिया शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. जिलकेवार डॉ. तवर, परिचारिका, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कदम यांनी महिलांवर यशस्वीरीत्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या.
आता दर मंगळवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST