शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणास गैरहजर कर्मचाऱ्यांंना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 01:06 IST

येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्य पदांसाठी होत असलेल्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणा-या अधिकारी- कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांनी नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देगुरूद्वारा बोर्ड निवडणूक अधिकारी, कर्मचा-यांचे प्रशिक्षण पूर्ण

नांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्य पदांसाठी होत असलेल्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणा-या अधिकारी- कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांनी नोटीस बजावली आहे.गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्य पदासाठी २८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी नांदेडसह औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी व चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचा-यांना १४ डिसेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात आले. शहरातील श्री गुरूग्रंथ साहिब भवन येथे झालेल्या या प्रशिक्षणास उपरोक्त सर्व जिल्ह्यांतील अप्पर जिल्हाधिकारी, सर्व अतिरिक्त पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सर्व क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष आदींची उपस्थिती होती. या प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, क्षेत्रीय अधिकारी तसेच इतर अधिकारी, कर्मचा-यांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गैरहजर असलेल्या अधिकारी, कर्मचा-यांनी आपआपल्या जिल्हाधिका-यांमार्फत खुलासा सादर करावा, असेही कळविण्यात आले आहे. गैरहजेरीचा खुुलासा सादर न करणा-या अधिकारी, कर्मचा-याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.१४ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबतचे मार्गदर्शन केले तर निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याबाबतचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केले. मतदानप्रक्रिया आणि मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी उपस्थितांना माहिती दिली. गुरुद्वारा बोर्ड निवडणुकीचे दुसरे प्रशिक्षण आणि निवडणूक साहित्य वाटप २५ डिसेंबर २०१८ रोजी गुरु ग्रंथसाहिब भवन येथे होणार आहे.बोर्डाच्या तीन जागांसाठी २६ उमेदवारगुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्य पदासाठी २६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकीत एकूण १२ हजार ७१४ मतदार आहेत. यात ५ हजार ८४३ महिला मतदार तर ६ हजार ८७१ पुरुष मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यासह औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बीड, लातूर या संपूर्ण जिल्ह्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना व जीवती या तालुक्यांत मतदार मतदान करु शकणार आहेत. २८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडSachkhand Gurudwara Nandedसचखंड गुरुद्वारा नांदेडElectionनिवडणूकBeedबीडJalanaजालनाAurangabadऔरंगाबाद