शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

उर्ध्व पैनगंगेच्या पाणलोट क्षेत्रात प्रकल्प नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:12 IST

अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नांदेड : पूर्ण क्षमतेने भरणाऱ्या जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी अडविल्यामुळे मागील काही वर्षांत हे धरण फार कमी वेळा पूर्ण क्षमतेने भरते. उर्ध्व पैनगंगेची अशी अवस्था टाळण्यासाठी त्याच्या पाणलोट क्षेत्रात नव्याने सिंचन प्रकल्प उभारू नका, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.मूळ मंजुरीनुसार इसापूर व सापळी या ठिकाणी सिंचन प्रकल्प उभारला असून, इसापूर धरणापासून निघणारा डावा कालवा ८४ कि.मी.चा, तर उजवा कालवा १७७ कि.मी. लांबीचा आहे. त्यासोबतच सापळी धरणाचा ६ कि.मी.चा पूरक कालवा निर्माण केला आहे. १९६८ मध्ये मान्यता दिलेल्या मूळ आराखड्यात ११९५ द.ल.घ.मी. पाणीसाठा अपेक्षित होता. मात्र, धरणाच्या वरील बाजूचा पाणी वापर वाढल्यामुळे १०८४ द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध झाले. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या वर पाणी साठवत गेले, तर इसापूर आणि सापळी धरणामुळे निर्माण होणारे सिंचन क्षेत्र ६,४०,००० हेक्टरपर्यंत कमी होईल़ त्यामुळे हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्याचा सिंचन अनुशेष वाढेल. धरणावर आधारित शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल. त्यामुळे प्रकल्पावरील खर्च व सद्य:स्थितीचा विचार करता उर्ध्व भागात प्रकल्पासाठी कुठल्याही प्रकारचे पाणी उपलब्ध करून न देण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.प्रकल्पावरील खर्च व सद्य:स्थितीचा विचार करता उर्ध्व भागात प्रकल्पासाठी कुठल्याही प्रकारचे पाणी उपलब्ध करून न देण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण