शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ना बसायला जागा, ना स्वच्छतागृह; सोयीसुविधा नसतानाही नांदेड बसस्थानकाचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 16:40 IST

प्रशासनाच्या हलगर्जीमुळे नागरिकांचे हाल; ‘साहेब एसीतून आदेश देतात, इथे एक दिवस येऊन बघा!’

नांदेड- शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असल्यामुळे अखेर प्रशासनाने बसस्थानक स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. १४ एप्रिलपासून हे बसस्थानक कवठा येथील मोदी ग्राउंडवर तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात आले. मात्र स्थलांतरीत करताना प्रवाशांच्या प्राथमिक गरजांचा विचार न करता, केलेल्या बदलामुळे सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दररोज ९०० बसद्वारे सुमारे १८०० फेऱ्यांच्या माध्यमातून हजारो प्रवाशांची ने-आण केली जाते. अशावेळी बसस्थानकातील सोयी-सुविधा गर्दीनुसार आवश्यक असताना तात्पुरत्या बसस्थानकावर पंखे नाहीत, वीज पूर्णपणे उपलब्ध नाही, बसण्यासाठी आसन व्यवस्था नाही आणि स्वच्छतागृहाचे काम अजूनही सुरूच आहे. परिणामी महिला, वयोवृद्धांसह लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गरमीचा प्रहर त्यात धुळीचा कहरसध्या एप्रिल महिना असून तापमान तब्बल ४१ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. अशा कडक उन्हात बसण्यासाठी सावली नाही, वाऱ्यासाठी पंखे नाहीत आणि पाण्याचीही पुरेशी व्यवस्था नाही. त्यात बस येताना उडणाऱ्या धुळीमुळे प्रवाशांचे हाल दुप्पट झाले आहेत. निवाऱ्यासाठी उभारलेल्या टीनशेडमध्ये बसलेल्या प्रवाशांवर उकाड्यामुळे चक्कर येण्याची वेळ आली आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीमुळे नागरिकांचे हालया स्थलांतरासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी बैठकाही झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने आवश्यक सुविधा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्या सूचना अमलात आणल्या गेल्या नाहीत. दरम्यान, स्थलांतराची लगीनघाई करत १३ एप्रिलपासून बसस्थानक स्थलांतरीत करण्याचे पत्रक काढण्यात आले. मात्र येथे कोणत्याच सोयी-सुविधा नसल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यावर विभाग नियंत्रकांनी पथक पाठवून सोयी-सुविधांची पूर्तता करूनच स्थलांतर करण्याचे सुधारित लेखी आदेश १२ रोजी काढले. परंतु, या आदेशाला केराची टोपली दाखवत यंत्रणेने कोणत्याही सुविधेविना गाड्या कवठ्यातून पाठविण्यास प्रारंभ केला आहे.

‘साहेब एसीतून आदेश देतात, इथे एक दिवस येऊन बघा!’एक प्रवासी म्हणाले, ‘साहेब बसलेत एसीमध्ये, फाईलवर सही करतात. पण एक दिवस इथे येऊन उभं राहून बघा, काय त्रास होतो! किती ऊन आहे, किती धूळ आहे, माणूस गरमीने हैराण होतो. इथे आल्याशिवाय त्यांना कळणार तरी कसं?’ ही प्रतिक्रिया प्रशासनाच्या प्रत्यक्ष सहभागाविना घेतल्या गेलेल्या निर्णयावर थेट बोट ठेवणारी आहे. नांदेड- शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असल्यामुळे अखेर प्रशासनाने बसस्थानक स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. १४ एप्रिलपासून हे बसस्थानक कवठा येथील मोदी ग्राउंडवर तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात आले. मात्र स्थलांतरीत करताना प्रवाशांच्या प्राथमिक गरजांचा विचार न करता, केलेल्या बदलामुळे सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडstate transportएसटी