शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात नाही 'एसडीआरएफ'चे पूर्णवेळ पथक; 'गोल्डन अवर'मध्ये मदतीसाठी लागतो वेळ

By प्रसाद आर्वीकर | Updated: June 14, 2024 13:11 IST

केवळ पावसाळ्यात नियुक्ती; 'गोल्डन अवर'मध्ये मदतीसाठी धुळे, पुण्याहून करावे लागते पथकास पाचारण

नांदेड : राज्य आपत्ती निवारण बलाची स्वतंत्र तुकडी मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात नसल्याने पावसाळा वगळता इतर वेळी निर्माण झालेल्या आपत्ती काळात मदत पुरविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागते. गोल्डन अवरमध्ये मदत न मिळाल्याने अनेक जीव गमाविण्याचा धोका निर्माण होतो. तेव्हा राज्य आपत्ती निवारण बलाची स्वतंत्र तुकडी पूर्णवेळ कार्यरत ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय आपत्ती निवारण बलाच्या (एनडीआरएफ) अंतर्गत राज्य आपत्ती निवारण बल कार्यरत असते. राज्यात कुठेही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांमार्फत तातडीने मदतकार्य केले जाते. त्यामुळे आपत्ती काळामध्ये अनेक जीव वाचू शकतात. संपूर्ण मराठवाडा विभागासाठी पावसाळ्यामध्ये एसडीआरएफची केवळ एक तुकडी नियुक्त केली जाते. आपत्ती केव्हाही सांगून येत नाही. त्यामुळे मराठवाड्यासाठी एसडीआरएफची स्वतंत्र पूर्णवेळ तुकडी नियुक्त करणे गरजेचे झाले आहे. दुसरीकडे विदर्भात नागपूर आणि धुळे या दोन ठिकाणी एसडीआरएफची स्वतंत्र तुकडी कार्यरत आहे; परंतु मराठवाड्यात आपत्ती निवारण बलाची तुकडी नसल्याने वेळेत मदत उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक जीव गमवावे लागतात. तेव्हा मराठवाड्यासाठी एसडीआरएफची तुकडी पूर्णवेळ कार्यरत ठेवावी, अशी मागणी होत आहे.

राज्यात बारा ठिकाणी एसआरपीएफ केंद्रमुंबई, पुणे, दौंड, सोलापूर, जालना, अमरावती, नागपूर, हिंगोली, धुळे, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, कोल्हापूर या १२ ठिकाणी राज्य राखीव बलाचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर, गोंदिया आणि कोल्हापूर या ठिकाणी राखीव बलाच्या तीन तुकड्या ठेवल्या आहेत. राज्य राखीव पोलिस बलातील जवानांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देऊन राज्य आपत्ती निवारण बलाची तुकडी कार्यरत केली जाते. विदर्भातील नागपूर आणि धुळे या ठिकाणी एसडीआरएफची तुकडी कार्यरत आहे. मराठवाड्यासाठीही छत्रपती संभाजीनगर, हिंगोली किंवा जालना येथे एसडीआरएफची पूर्णवेळ तुकडी कार्यरत करणे सोयीचे होऊ शकते.

मदतीसाठी लागतात ७ ते १० तासपावसाळा वगळता इतर काळात मराठवाड्यामध्ये आपत्ती परिस्थिती निर्माण झाली तर मदतकार्य मागविण्यासाठी किमान ८ ते १० तास लागतात. धुळे येथून एसडीआरएफची टीम दाखल होण्यासाठी ८ तास तर पुणे येथून एनडीआरएफची टीम दाखल होण्यासाठी किमान १० तास लागतात. आपत्ती काळात गोल्डन अवर असलेल्या पहिल्या एक तासात मदत मिळाली तर अनेक जीव वाचू शकतात.

एका तुकडीत ३५ जवानराज्य आपत्ती निवारण बलाच्या एका तुकडीमध्ये एक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, दोन चालक आणि ३० जवान अशा ३५ जणांचा समावेश असतो.

२८ जणांचे वाचविले होते जीवमागील वर्षी पावसाळ्यात मराठवाड्यासाठी नियुक्त केलेली एसडीआरएफची टीम नांदेड येथे मुक्कामी होती. या पथकातील जवानांनी मुदखेड, अर्धापूर, कासारखेडा, माहूर आदी ठिकाणी बचाव कार्य करून २८ जणांना पुरातून बाहेर काढले होते. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाला बाहेर काढून त्याचा जीव वाचविण्याचे मोलाचे काम एसडीआरएफच्या जवानांनी केले होते.

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊस