शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

‘ना किसीसे दोस्ती, ना किसीसे बैर’; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी घेतला राजकीय सन्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 16:43 IST

विचारांची शिदोरी सोबत घेवून आज मी माझे राजकारण थांबवित असल्याचे सूर्यकांता पाटील यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्दे १९८६ मध्ये काँग्रेसकडून त्या राज्यसभेवर १९९१, १९९८ आणि २००४ असे तीन वेळा  त्या लोकसभेत पोंहचल्या.केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री या पदाची धुराही त्यांनी सांभाळली.नंतरच्या काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

नांदेड : आक्रमक नेत्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी बुधवारी रात्री उशिरा सोशल मिडियावर संदेश टाकत राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. आजवर एकटीने सगळं जिंकलं, परंतु कंटाळा येईपर्यंत प्रवास करण्याची माझी तयारी नसल्याचे सांगत विचारांची शिदोरी सोबत घेवून आज मी माझे राजकारण थांबवित असल्याचे सूर्यकांता पाटील यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या सूर्यकांता पाटील यांची कारकीर्द चढती राहिली आहे. नांदेड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून आपल्या कामाची चुणूक दाखविल्यानंतर १९८० मध्ये हदगाव मतदारसंघातून निवडून येत  त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर १९८६ मध्ये काँग्रेसकडून त्या राज्यसभेवर गेल्या तर १९९१, १९९८ आणि २००४ असे तीन वेळा  त्या लोकसभेत पोंहचल्या. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री या पदाची धुराही त्यांनी सांभाळली. मात्र नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकी वेळी हिंगोली मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरीही विधान परिषदेवर वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु पक्षाने रामराव वडकुते या नव्या चेहऱ्याला मैदानात आणले. त्यानंतर सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.  बुधवारी रात्री उशिरा फेसबुकवर पोस्ट करीत आपण राजकीय प्रवास थांबवित असल्याचे म्हटले आहे. या पुढे नव्या पिढीसाठी काम करीन, घरी बसणार नाही, असेही त्यांनी या संदेशामध्ये म्हटले आहे.

सूर्यकांता पाटील यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट अशी आहे...

आता थांबावे असे वाटत नाही,खूप प्रेम मिळाले जळणारे होते, पण प्रेम करणाºयांची संख्या अधिक होती. मला ते सर्व मिळाले जे सामाजिक जीवनात असणाºया व्यक्तीला मिळायला हवे, ४३ वर्ष राजकारणात होते़ एखाद्या राजकुमारी सारखी राहिले़ ४०० रुपयांची साडी ४००० हजाराच्या थाटात नेसली. मिळालेले काम मन लावून केले. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अशा अनोख्या प्रांतात माझ्या सारखी मनस्वी रमू शकत नाही. राजीनामा लिहून तयार होता, पण मी आहेच कोण म्हणून, एवढा  शो करायचा? सगळ्यांनीच प्रेम दिले, सन्मान दिला, काहीच तक्रार नाही. आपलीच लायकी नाही हे समजले होते, रागात घेतलेले निर्णय असेच असतात, ते योग्य की अयोग्य हे सारासार बुद्धीला जेव्हा ठरविता येत नाही़ तिथे तोंडाला नवा रंग लावून विचार बदलत नाहीत, हे पक्के समजलंय. त्यामुळे धाकटे लोक राजकारण सोडतो म्हणत असताना मला आता काय मिळवायचे आहे? एकटीने सगळे जिंकले, लोकांना कंटाळा येईपर्यंत प्रवास करायची माझी तयारी नाही. ज्यांच्यासाठी काम केले त्यांनी सन्मानही केला आणि आज जे नाहीच आहेत त्यांच्या आठवणी मनात आहेत. आपण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो याची खंत आहे. पण माझा निस्वार्थ प्रवास मला फार समृद्ध करून गेला. जेव्हा लिहायचे तेव्हा लिहिलं पण आज मी माझा राजकीय प्रवास थांबवित आहे. यापुढे नव्या पिढीसाठी काम करीन, घरी बसणार नाही. बसून कुरवळण्याएवढे काही नाही माझ्याजवळ. विचारांची शिदोरी घेऊन आज मी माझे राजकारण थांबवित  आहे.  सगळ्या सहप्रवासी सहकाºयांचे हार्दिक आभार. मी आहे, कधीही या, घर आणि मी तुमचीच आहे. नमस्कार सगळ्यांना़ थांबते. 

टॅग्स :PoliticsराजकारणNandedनांदेडBJPभाजपाcongressकाँग्रेस