शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

ना परीक्षा, ना निकाल, तरी मंत्री? संजय राठोड यांचे विचित्र तर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 06:09 IST

Sanjay Rathod: नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या बैठकीत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या कार्यक्षमतेवरच नव्हे, तर एकूणच अभ्यासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

नांदेड - नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या बैठकीत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या कार्यक्षमतेवरच नव्हे, तर एकूणच अभ्यासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. 'मी कधीच परीक्षा दिली नाही, कुणी माझा पेपर तपासला नाही, मग मी नापास कसा? असे वक्तव्य करून संजय राठोड यांनी स्वतःच्या जबाबदारीपासून हात झटकण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला आहे.

मंत्रिमंडळाच्या प्रगतीपुस्तकात राठोड यांना नापास म्हणून दाखवले गेले आणि त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी 'मीच तुम्हाला नापास करेन' असा रोखठोक, पण असंवैधानिक इशारा देत माजी मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

शिंदे गटाचा मंत्री असताना ठाकरे गटाशी जवळीक ज्याने कोणतीच परीक्षा दिली नाही, तो मंत्री कसा झाला? ही विचारण्याजोगी गोष्ट आहे. जर मंत्री होण्यासाठी कर्तृत्व, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची परीक्षा लागत नाही, तर मग ही पदे काय केवळ ‘फोन येतात’ म्हणून मिळतात का? तसेच त्यांनी  'उद्धव ठाकरे यांचे आजही मला फोन येतात.' हे म्हणत त्यांनी सत्तेत असूनही दोन तटांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला की काय? अशी कुजबूज उपस्थितांमध्ये सुरू झाली होती. दरम्यान, शिंदे गटाचा मंत्री असताना ठाकरे गटाशी जवळीक दाखवणे ही राजकीय निष्ठेची विटंबना नाही का? अशी चर्चा आहे.

म्हणे, मी तसे बोललोच नाही...मंत्री संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले, 'मी असे बोललोच नाही.' त्यांनी घेतलेल्या या यू टर्नची देखील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडNandedनांदेड