शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवव्या महिन्यात १७० कि.मी. चालून रस्त्यात झाली बाळंतीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 17:06 IST

कल्याण ते नाशिक जिल्ह्यातील घोटी असा एकूण १७० किलोमीटरचा प्रवास सुजाताने आई-वडिलांसोबत पायी केला. घोटीला पोहोचल्यानंतर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

ठळक मुद्देहदगाव येथील कुटुंब कामासाठी गेले होते कल्याणलागुत्तेदाराने कामाचे पैसेही बुडविले

हदगाव (जि. नांदेड) : लॉकडाऊनमुळे अनेकांना विविध प्रसंगांना तोंड देण्याची वेळ आली आहे. असाच काहीसा प्रसंग हदगाव येथील सुजाता राहुल पवार या गर्भवती महिलेवर आला. नऊ महिन्यांच्या गर्भवती असताना कल्याण ते नाशिक जिल्ह्यातील घोटी असा एकूण १७० किलोमीटरचा प्रवास सुजाताने आई-वडिलांसोबत पायी केला. घोटीला पोहोचल्यानंतर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

हदगाव येथील आठ ते दहा मजूर गरीबीची परिस्थिती असल्याने एका कामगाराच्या सहकार्याने कल्याण (ठाणे) येथे पोट भरण्यासाठी गेले होते. त्यात रामराव बाभूळगावकर यांचाही समावेश होता. कोरोनामुळे शासनाने लॉकडाऊन घोषित केला आणि गुत्तेदाराने काम बंद केले. कामावरील सर्व मजुरांना गावी परत जाण्याचे गुत्तेदाराने सांगितले. गावी जाण्यासाठी एखाद्या वाहनाची सोय करुन द्यावी, अशी विनंती या मजुरांनी गुत्तेदाराकडे केली; परंतु गुत्तेदाराने मी काही करू शकत नाही म्हणून सर्व मजुरांना वाऱ्यावर सोडले. 

जाण्याची सोय नसल्याने तसेच हातात काहीही पैसा नसल्याने या सर्व मजुरांनी पायीच जाण्याचा निर्णय घेतला. मात्र यात रामराव बाभूळगावकर यांची चांगलीच अडचण निर्माण झाली. त्यांची मुलगी सुजाता पवार ही गरोदर होती. सुजाताचे नऊ महिने भरलेले असल्याने नऊ दिवसात ती केव्हाही प्रसूत होणार. हातात पैसा नाही. राहायला आधार नाही, तिथेच राहावे तर जगावे कसे, यामुळे ते चिंतेत पडले. अशाही परिस्थितीत सुजाताने आई-वडिलांसह पायी गाव गाठण्याचा निर्णय घेतला. कल्याणहून ते २९ एप्रिलला निघाले. रस्त्याने मिळेल ते खाल्ले व काही वेळ उपाशीही राहण्याची वेळ आली. पाच दिवस चालल्यानंतर घोटी गावाजवळ त्यांचा ताफा थांबला. 

यादरम्यान सुजाताला प्रसूतीकळा सुरू झाल्या. योगायोगाने घोटीतच आरोग्य केंद्र होते. गावातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी तिला मदत केली. आरोग्य केंद्रात दाखल केले. सहाव्या दिवशी सुजाताने गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ व बाळंतीन दोघेही सुखरुप असल्याने दवाखान्यातून सुटी देण्यात आली. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी बाळासह या मजुरांना ८ मे रोजी हदगावला आणून सोडले. 

गुत्तेदाराने कामाचे पैसेही बुडविलेकल्याणला हे मजूर ज्या गुत्तेदाराकडे काम करीत होते. त्याने लॉकडाऊननंतर त्यांच्या कामाचे पैसे देण्यास नकार दिला. लॉकडाऊननंतर बघू असे सांगून त्याने सर्वांना वाऱ्यावर सोडले. किमान आठ ते दहा हजार रुपये तरी द्यावेत, अशी विनंती मजुरांनी केली. पण गुत्तेदाराने ऐकले नाही. गावी जाण्यासाठी  कुठल्याही वाहनाची व्यवस्था केली नाही. पाच दिवस पायी चालण्याने आलेला थकवा तसेच गुत्तेदाराने पैसा न दिल्याचा राग सुजाताला मुलगा झाल्याच्या आनंदात विसरला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpregnant womanगर्भवती महिलाNandedनांदेड