मुदखेड : नऊ वर्षांपासून फरार असलेल्या इस्लामपूर येथील एका आरोपीस जेरबंद करण्यात मुदखेड पोलिसांना यश आले आहे. पोलीस या आरोपीचा कसून शोध घेत होते.इस्लामपूर येथील मोहमद फेरोज शेख इस्माईल या ३५ वर्षीय तरुणाविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागल्यानंतर मोहमद फेरोज शेख इस्माईल हा पसार झाला होता. तेव्हापासून मुदखेड पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र या पोलीस पथकाला यश मिळाले नव्हते.दरम्यान, मोहमद फेरोज शेख इस्माईल याच्याबाबतची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर मुदखेड पोलिसांनी योजनाबद्ध पद्धतीने जावून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. माच्छरे, पो.उ.नि. शिंदे, स.पो.उपनि. राठोड, पठाण, पो.कॉ. बुक्करे, कुकडे, चौधरी, महाबळे, राठोड यांनी केली.मोठे यशनऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात आले. हे मुदखेड पोलिसांचे मोठे यश असल्याचे पो. नि. माच्छरे यांनी सांगितले.
नऊ वर्षांपासून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:32 IST