शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मतदारांची नवख्यांना साथ; दिग्गजांना मात देत १७ दिवसात केले आमदार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 19:55 IST

नवख्या उमेदवारांसाठी मतदारांनीच हातात घेतली निवडणूक अन् उधळला गुलालही

ठळक मुद्देनांदेडमध्ये नवख्या उमेदवारांना मिळाली संधी हंबर्डे, कल्याणकर यांची दिग्गजांवर मात

- विशाल सोनटक्के

नांदेड : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवसापर्यंत नांदेड उत्तरमध्ये बालाजी कल्याणकर आणि नांदेड दक्षिणमध्ये मोहन हंबर्डे यांच्या नावाची चर्चाही नव्हती़ मात्र, ऐनवेळी अनपेक्षितरीत्या पक्षाचे तिकीट मिळाले आणि हे दोघेही कामाला लागले़ कल्याणकर यांनी मतदाराचे पाय धरीत पदरात घ्या, असा आर्जव सुरू केला़, तर हंबर्डे यांनी प्रत्येक गावात पोहोचण्यासाठी रात्रीचा दिवस केला़ शेवटी दोघांची मेहनत फळास आली़ या मतदारसंघांत मतदारांनीच निवडणूक हातात घेतली आणि शहरातील दोन्ही मतदारसंघात आश्चर्यजनक निकालाची नोंद  झाली़ यामुळे फॉर्म भरणे ते मतमोजणी या अवघ्या १७ दिवसांमध्ये या नवख्या उमेदवारांना मतदारांनी आमदार केल्याची चर्चा आहे.

सर्वाधिक ३८ उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे नांदेड दक्षिण मतदारसंघ यंदा चर्चेत राहिला़ येथे शिवसेना-भाजपत जागेसाठी मोठी रस्सीखेच झाली़ मात्र शिवसेनेने हा मतदारसंघ भाजपला सोडला नाही़ त्यामुळे नाराज झालेले भाजपचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते बंडखोर म्हणून रिंगणात उतरले़ शिवसेनेकडून हिंगोलीचे खा़ हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळाली़, तर वंचित बहुजन आघाडीकडून फारुख अहमद आणि एमआयएमकडून नगरसेवक साबेर चाऊस यांच्यामुळे दक्षिण मतदारसंघात चुरस वाढली़ 

काँग्रेसच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या़ मात्र काँग्रेसने ऐनवेळी मोहन हंबर्डे हा चर्चेत नसलेला चेहरा देऊन सर्वांनाच धक्का दिला़ शिवसेनेने ही जागा प्रतिष्ठेची केली होती़ त्यांना भाजप बंडखोर दिलीप कंदकुर्ते यांचेही कडवे आव्हान होते़ दुसरीकडे वंचित आणि एमआयएमनेही जोर लावला होता़ मात्र सरतेशेवटी हंबर्डे साडेतीन हजार मतांनी विजयी झाले़ उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये पोहोचून हंबर्डे मतदारांना हात जोडत होते़ आजवर नेत्यांना मते दिली, आता कार्यकर्त्याला संधी द्या, एवढीच विनंती ते करायचे़ हीच विनयशीलता हंबर्डे यांच्या कामी आली़ रिंगणातील सेनेच्या राजश्री पाटील आणि दिलीप कंदकुर्ते या दोघा बलाढ्य उमेदवारांना मागे सारत हंबर्डे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली़  वंचित आघाडी आणि एमआयएम यांनी खेचलेली लक्षवेधी मतेही त्यांच्या पथ्यावर पडली़ 

नांदेड उत्तरमध्ये विनवणीवर भरनांदेड दक्षिणप्रमाणेच उत्तर मतदारसंघातून मतदारांनी यावेळी बालाजी कल्याणकर या शिवसेनेच्या एकमेव नगरसेवकास जिल्ह्यातील शिवसेनेची एकमेव आमदारकी बहाल केली़ कल्याणकर यांचेही नाव शिवसेनेकडून अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झाले़ या मतदारसंघात काँगे्रसचे माजी मंत्री डी़पी़ सावंत यांच्याशी त्यांचा थेट सामना होता़ काँग्रेस येथून सलग दोनदा निवडून आली होती़ त्यामुळे सावंत यांचे पारडे जड होते़  येथेही वंचित बहुजन आघाडीचे मुकुंद चावरे आणि एमआयएमचे फेरोज लाला कितपत मजल मारतात यावर निकाल अवलंबून राहील असा अंदाज होता़ नवख्या असलेल्या कल्याणकर यांची उमेदवारी काँग्रेसने सहजपणे घेतली़ मात्र कल्याणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भेटेल त्या मतदाराचे हातपाय धरून पदरात घ्या, अशी विनवणी करण्यास सुरुवात केली़ घराघरात पोहोचण्याचा चंग बांधत त्यांची धावपळ सुरू झाली आणि  सहानुभूती निर्माण होऊ लागली़ कल्याणकर यांनी प्रचाराच्या काळात एकही सभा घेतली नाही़ कसलाही डामडौल केला नाही़ दुसरीकडे तळमळीने काम करणारा आणि सहज भेटू शकणारा नगरसेवक  अशी ओळखही कल्याणकर यांच्या कामी आली़ त्यामुळे शेवटच्या टप्प्यात मतदारच कल्याणकर यांच्या विजयासाठी एकवटल्याचे दिसून आले़ याचे प्रत्यंतर निकालात उमटले़  काँग्रेसचे दिग्गज उमेदवार डी़पी़ सावंत यांना येथून तब्बल १५ हजारांहून अधिकच्या मताधिक्याने पराभूत करीत कल्याणकर यांनी जिल्ह्यात शिवसेनेला एकमेव विजय मिळवून दिला़  

टॅग्स :Nandedनांदेडcongressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019