शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

राष्ट्रीय महामार्ग रस्ता बनला चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:33 IST

मागील काही दिवसांपासून भोकरफाटा ते भोकर राष्ट्रीय महामार्ग कामास सुरुवात करण्यात आली होती़ मात्र हे काम सहा महिन्यांपासून बंद पडले आहे़ अर्धवट केलेल्या कामावर माती असल्याने पावसाने चिखल झाला असून राष्ट्रीय महामार्ग चिखलमय बनला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबारड : मागील काही दिवसांपासून भोकरफाटा ते भोकर राष्ट्रीय महामार्ग कामास सुरुवात करण्यात आली होती़ मात्र हे काम सहा महिन्यांपासून बंद पडले आहे़ अर्धवट केलेल्या कामावर माती असल्याने पावसाने चिखल झाला असून राष्ट्रीय महामार्ग चिखलमय बनला आहे़महामार्गावर दहा चाकी अवजड वाहने फसण्याच्या घटना दररोज घडत असून वाहने फसल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे़ भोकरफाटा ते भोकर हा राष्ट्रीय महामार्ग धोकादायक बनल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. दरम्यान, वाहनधारकांना महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून सहकार्य मिळत असल्याने वाहनधारकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे़महामार्गावरील खरबीपासूनचा समोरील रस्ता चिखलमय झाल्याने भोसीजवळ दररोज अवजड ट्रक फसण्याच्या घटना घडतात़ १३ जुलैै रोजी बारा चाकी ट्रक फसल्याची घटना घडल्याने महामार्ग सकाळी ७ वाजल्यापासून १ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद होता़ बारड महामार्ग पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली़ महामार्ग पोलीस कर्मचारी देवघरे, ए.एस.आय.महाबळे, हुंबडे, पोना चनाजोलु, सुरनर, धुळगंडे, फारूकी, पोतदार आदींनी मदतीसाठी परिश्रम घेतले़हा रस्ता धोकादायक बनल्याने भोकरफाटा ते भोकर जाण्यासाठी चार तास वेळ लागत असून रस्त्यावरुन वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे़ जीव मुठीत धरून रस्त्यावरून वाहन चालवावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथील वाहन- चालकांनी व्यक्त केली आहे.महामार्ग रस्त्याचे काम अर्धवट असल्याने राष्ट्रीय महामार्ग रस्ता हा चढउतार बनल्याने दररोज अपघाती घटना घडत आहेत. पांढरवाडी, बारड महामार्ग रस्त्यावर आंबेगाव कॉर्नरजवळील रस्त्यावर मोठमोठी दहा बाय दहा या आकाराचे खड्डे पडली असल्याने महामार्ग रस्त्यावर पाण्याचे डबके साचून असल्याने महामार्गावरील खड्ड्यातील पाण्यातून रस्ता शोधताना दररोज वाहनधारकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. खैरगावपासून येळेगावपर्यंत रस्ता हा चाळणी झाला असून मोठमोठ्या प्रमाणात खड्डे आहेत़

टॅग्स :highwayमहामार्गRainपाऊस