शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:29 IST

किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ वरील कोठारी ते हिमायतनगर या रस्त्याचे केवळ १९ टक्के काम झाले आहे. त्यातच या भागात झालेल्या पावसामुळे हा संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून, दुचाकी घसरुन पडत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले.

ठळक मुद्देकिनवट-भोकर राष्ट्रीय महामार्ग कोठारी-हिमायतनगर रस्त्याचे केवळ १९ टक्के काम

किनवट : किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ वरील कोठारी ते हिमायतनगर या रस्त्याचे केवळ १९ टक्के काम झाले आहे. त्यातच या भागात झालेल्या पावसामुळे हा संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून, दुचाकी घसरुन पडत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले.कोठारी ते हिमायतनगर मार्गाच्या कामाला २७ जून रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. करारानुसार काम २७ जून रोजीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आजघडीला या मार्गाचे केवळ १९ टक्के काम पूर्ण झाले. त्यातही केवळ मुरुम भराव (सबग्रेड) च्या पलीकडे काम पोहोचलेले नाही. अर्धवट व निकृष्ट दर्जाच्या या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ३०८ कोटी रुपयांची निविदा असलेले सदर रस्त्याचे काम इन्फोटेक कंपनीला देण्यात आले होते.कंपनीच्या मालकाने सदर काम सब कंत्राटदार राठी यांना दिले. मात्र या कंत्राटदाराने करारानुसार कार्यवाही केली नाही. या अनुषंगाने आ. प्रदीप नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात हाच मुद्दा लावून धरला होता.यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री परिणय फुके यांनी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. मात्र यावर समाधान न झाल्याने नाईक यांनी सदर कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुत्तेदाराला टर्मिनेट करीत त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची घोषणा केली होती.राष्ट्रीय महामार्ग विभागाचा खोडाअधिवेशनामध्ये सदर महामार्गाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदर रस्त्याचे काम येत्या १५ दिवसांत सुरु करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र या घोषणेला २२ दिवसांचा कालावधी उलटला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांनी तयार केलेले अंदाजपत्रक अद्यापही सचिवस्तरावरच आहे.या प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय महामार्ग विभाग खोडा घालीत असल्याची चर्चा आहे. तातडीने करावयाच्या कामाला पावसाळ्यानंतर मंजुरी देणार का? असा सवाल आहे. याबाबत बांधकाम विभाग किनवटचे उपअभियंता दिलीप बोबडे म्हणाले, कामाचे अंदाजपत्रक आपण स्वत: तयार केले असून ते मुंबई येथे सचिवांकडे सुपूर्द केले आहे.

टॅग्स :Nandedनांदेडhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूक